Friday, 17 October 2025

बाबासाहेब आंबेडकर, नावं हे गाजतय हो, जगभर' या अजरामर गाण्याचे महाकवी हरेंद्र जाधव

'बाबासाहेब आंबेडकर, नावं हे गाजतय हो, जगभर' या 
अजरामर गाण्याचे महाकवी हरेंद्र जाधव 

एक, एक शब्द वेचून गाण्याची माळ  गुंफून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची, प्रबाेधनाची साज जुळविणारे, आपल्या लेखणीतून, गाण्यातून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा उभी करणारे दहा हजाराहून अधिक गाणी लिहिणारे, ६० वर्षाहून अधिकचा काळ हा कलेच्या माध्यमातून समाजप्रबाेधनासाठी खर्च करणारे मुख्याध्यापक, जलसाकार, शाहीर, कवी, गीतकार, आंबेडकरी चळवळीत सक्रिय सहभाग, समाजसेवक, लाेकनाट्यकार, कथा लेखक , महाराष्ट्राच्या साहित्य, सांस्कृतिक, शैक्षिणक आणि सामाजिक क्षेत्रात खारीचा वाटा असणारी व्यक्तिमत्त्व प्रतिभावंत प्रसिद्ध लाेककवी म्हणजेच कवी हरेंद्र हिरामण जाधव...

अनेक गाणी आपण ऐकली असतील. त्यातील ‘पहा पहा मंजुळा, हा माझ्या भिमरायाचा मळा’ हे गाणं हरेंद्र जाधव यांनी लिहून बाबासाहेबांनी आपल्याला एक मळा निर्माण करून दिला आणि त्या मळ्यात आपण सर्वजण आज समतेचा नातं जाेडून राहत आहाेत. अशा छान गाण्यातून हरेंद्र जाधव यांनी आंबेडकरी चळवळीशी आपली नाळ घट्ट जाेडली आहे.  ‘हे खरंच आहे खरं, की भीमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर, नाव हे गाजतंय हाे जगभर, जेव्हा जेव्हा ही गाणी ओठावर येतात तेव्हा मन भारावून जातं. मन प्रसन्न हाेतं. दीक्षा आम्हा दिली भीमाने, मंगल दिन ताे जनी हे गाणं ऐकताच १४ ऑक्टबर १९५६ साली नागपूरच्या दीक्षाभूमीवरती डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रक्ताचा एकही थेंब न सांडवता धर्मांतर करून ‘न भूताे ना भविष्यति’ अशी अद्भुत क्रांती घडवून आणली. त्या दिवसाची आठवण या गाण्यातून हाेते आणि एका क्षणात असं वाटतं की, गाण्यातून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा समाेर उभी राहिली आहे. एवढी ताकत ज्येष्ठ कवी हरेंद्र जाधव यांच्या लेखणीत हाेती.

१६ फेब्रुवारी १९३३ राेजी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील मिग ओझर गावात हरेंद्र जाधव यांचा जन्म झाला. आंबेडकरी चळवळीच्या आणि गाण्याच्या साहित्यिक ध्येयापाेटी हरेंद्र जाधव मुंबईत आले. मिग ओझर या गावाची ओळख आज आंबेडकरी चळवळीतील एक ऐतिहासिक गावं म्हणून ओळखली जाते. मुंबई महापालिकेच्या विविध शाळांमध्ये हरेंद्र जाधव यांनी ३३ वर्षे शिक्षक म्हणून काम केले. सेवेतील शेवटची काही वर्षे ते मुख्याध्यापक म्हणून कार्यरत हाेते. पुढे मुख्याध्यापक पदावरून १९९२ साली निवृत्त झाले. 

शिक्षक हा समाजाचा आरसा असताे हे ज्येष्ठ कवी हरेंद्र जाधव यांनी दाखवून दिले आणि आंबेडकरी चळवळीचा ते भाग बनले. १९८८ पर्यंत जवळ जवळ पंधरा वर्ष हरेंद्र जाधव ट्राॅम्बे काेळीवाडा या महानगरपालिकेच्या शाळेत कार्यरत हाेते.  शाहीर वामनदादा कर्डक यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह हाेता. त्या स्नेहातूनच नाशिकमध्ये स्थापन झालेल्या ‘महाकवी वामनदादा कर्डक’ प्रतिष्ठानाशी त्यांचे अतूट नाते हाेते. जाधवांनी १९५० च्या सुमारास वयाच्या १७ व्या वर्षापासून आपल्या गीतलेखनाला सुरुवात केली. १९५८ ते २०२१ पर्यंत एकूण ६३ वर्ष ते मुंबईत वास्तवास हाेते. जी सुरुवात त्यांनी लिहायला केली ते शेवटच्या श्वासापर्यंत लिहत हाेते. विशेष म्हणजे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका सभेतच आपले पहिले गीत लिहिले आणि त्यांच्यासमाेरच गाणी सादर करणारे व्यक्ती म्हणजे हरेंद्र जाधव...

१९५० साली नाशिकला गंगातीरी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची माेठी सभा हाेती. त्या सभेत १९५० साली ‘बाबांची माेटार आली, गर्दी ही हटवा’ हे पहिले भीमगीतं लिहिले. जाधव यांनी गीत लिहून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल असलेली आत्मीयता दाखवली आणि आपल्या लेखणीतून लाेकांच्या मनावर राज्य केले. त्याचबराेबर ‘पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा, हे खरंच आहे खरं श्री भीमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर कर नाव हे गाजतंय हाे जगभर’ ही गाणे जगभर प्रसिद्ध झाली. भीम जयंतीला ही गाणी वाजल्याशिवाय भीमजयंती पूर्ण हाेतच नाही अशी ही अजरामर ठरलेली त्यांची गीते.

शाहीर कृष्णा शिंदे, शाहीर साबळे, प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप, सुरेश वाडकर, रंजना शिंदे, श्रावण यशवंते, विठ्ठल भेडे, अजित कडकडे, आनंद शिंदे, राेशन सातारकर, सुलाेचना चव्हाण, अनुराधा पाैडवाल, साधना सरगम, उत्तरा केळकर, वैशाली सामंत, शकुंतला जाधव, किसन खरात, दत्ता जाधव, बेला सुलाखे अशा अनेक नामवंत गायक, संगीतकारांनी त्यांच्या गीतांना स्वरसाज चढवला. त्यांच्या गीतांवर पाेवाडे, लाेकनाट्याच्या ध्वनिमुद्रिका, ध्वनिफिती
आज अजरामर आहेत. त्यांच्या लेखणीचा डंका सर्वजगी गाजताे आहे. 

१९७२ साली ‘आता तरी देवा मला पावशील का सुख ज्याला म्हणतात ते दावशील का’ या गाण्याने त्यांनी लाेकप्रियता मिळवली. ‘माझ्या नवèयानं साेडलिया दारू’ हे लाेकगीत कमालीचे लाेकप्रिय ठरले. हिèया माेत्याच बाशिंग बांधा नवरीला, माझ्या लग्नाचा बँड बाजा वाजताे, ही गाणी लगीन सराईत प्रत्येक लग्नात माेठ्या प्रमाणात वाजवली जातात. भीमगीते : ‘पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा’, ‘बाबासाहेब आंबेडकर, नावं हे गाजतय हाे ,जगभर’, चाललीस रमा तू मला साेडूनी, ‘भीमरायानं समतेचा झेंडा जगी राेविला’ दिसते काेणाची गाडी हिरव्या रंगाची जाेडी जा गं सयांनाे कुणी पाहून या हे जयंती दिना ही तुला प्रार्थना हाेऊ हे या दिनी भीम जन्म, बुद्ध विहारा, पुन्हा रमाबाई पत्र लिहते, भक्तीगीते : ‘तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता’, ‘आता तरी देवा मला पावशील का’, ‘मंगळवेढे भूमी संतांची’, लाेकगीते : आगरान गेलू बाय डाेंगरानं गेलू गाे, पायानं काटा माझे भरलान गाे, ‘माझ्या नवèयानं साेडलिया दारू’, ‘देवा मला का दिली बायकाे अशी, महागाईचा काळ असा, घेतलंय मनावर, दुनिया सारी साेड परी आई बाप हे साेडू नकाे लग्नगीते : हिèया माेत्याच बाशिंग बांधा नवरीला, माझ्या लग्नाचा बँड बाजा वाजताे. लग्नाच्या रेशमी गाठी तर विशेष म्हणजे भक्तिगीते, भावगीते, भीमगीते , काेळीगीते, लग्नगीते, लावण्या, पाेवाडे, लाेकनाटय, कथा असे चाैफर लिखाण लाेककवी हरेंद्र जाधव यांनी केले आहे. गाण्याचा जलसा संपल्यावर कलाकारांचा एक नारळ आणि सव्वा रुपया देऊन गावातील लाेक सत्कार करीत असत आणि तेच मानधन लाख माेलाच ठरलं आहे. त्यांच्या ६०० हून अधिक ध्वनिफिती लाेकार्पित झाल्या आहेत. तर नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

जाधवांची कन्या तारका जाधव आणि राजा कांदळकर, शरद शेजवळ यांच्या पुढाकाराने ‘लाेककवी हरेंद्र जाधव साहित्य संस्था’ स्थापन केली. या संस्थेर्माफत ‘गीत भीमायन’, ‘गीत रमायण’ आणि ‘संसार माझा आंबेडकरी’ हे गीतसंग्रह प्रकाशित केले. त्या साहित्यातून समाजाचे प्रबाेधन कसे हाेईल याकडे त्यांची कन्या कवयित्री तारका हरेंद्र जाधव लक्ष देणार आहे. असे त्यांनी माझ्याशी बाेलताना सांगितले. त्यातून अनेक गाण्यातून प्रबोधनाची मशाल तैवत ठेवण्याच कामं कलाकारांचं सुरू आहे. महान कलाकाराने साहित्यातून एवढी सेवा दिली, मात्र सरकार दरबारी कोणतेही दखल अशा महान कलाकाराची घेतली गेली नाही अशी खंत त्यांची कन्या तारका जाधव,कुटुंबीयांनी आणि चाहत्यांनी व्यक्ती केली आहे. 

२४ एप्रिल २०२१ मध्ये वयाचा ८८ वर्षी नवी मुंबईत सानपाडा येथे अखेरचा श्वास त्यांनी घेतला. परिवर्तनाच्या चळवळीत त्यांचे विशेष योगदान आहे. आज ते आपल्यात नसले तरी मात्र त्यांनी गाणी लिहिलेली अजरामर गीते आजही आपल्याला त्यांची आठवण करून देतात. निधनाने आंबेडकरी, सांस्कृतिक चळवळीची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या लेखणीतून निर्माण झालेल्या साहित्याचा प्रसार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ अधिक गतिमान करू या...
 

लेखक - कवी , पत्रकार मिलिंद जाधव, पडघा भिवंडी
मो.८६५५५६९४३६

2 comments:

  1. खूप सुंदर मांडणी केली

    ReplyDelete
  2. आयुष्यमान मिलिंदजी जाधव, पडघा,भिवंडी आपले अभिनंदन !आपण "दिवंगत हरेंद्र जाधव" डाॅ.आंबेडकरी चळवळीतील "अजरामर व्यक्तीमत्व " आपल्या लेखणीतून साकारुन आजच्या तरुण पिढीला जाण करुन दिलेली आहे!!... ( आपलाच :— शशिकांत भीमराव जाधव, ७५+ज्येष्ठ नागरिक, सन१९५४मधे लोणावळा मुक्कामी डाॅ.बाबासाहेबांच्या चरणांचे प्रत्यक्ष दर्शनलाभी, रा. सिद्धार्थनगर, लोणावळा,ता.मावळ, जि.पुणे४१०४०१ / मोबि.नं. 9403358160 )

    ReplyDelete

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !!

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !! भिवंडी, प्रतिनिधी : ठाणे जिल्...