Friday, 17 October 2025

तालूका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र ईटकरे यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न.!!

तालूका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र ईटकरे यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न.!!

उरण दि १७, (विठ्ठल ममताबादे) : इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालय, उरण येथे तालूका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र ईटकरे यांचा "निरोप समारंभ" डॉ बी एम कालेल - वैद्यकीय अधीक्षक इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण यांच्या वतीने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी एम कालेल यांनी करतेवेळी डॉ ईटकरे यांच्या शांत, संयमी आणि सर्वांना बरोबर घेऊन करण्याची त्यांची पद्धत तसेच कितीही मोठा प्रसंग असेल तरी शांत पणे विचार करून त्या प्रसंगाला सामोरे जाणे हे स्वभाव वैशिष्ट्ये विषद केले. आणि उपस्थीतांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला उरण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  हानिफ मुलानी,उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समिर जाधव, कामगार नेते  संतोष पवार, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, ॲड. राजेंद्र मढवी आणि इंदिरा गांधी ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्सेस तसेच इतर स्टाफ मोठ्या संख्येने आत्मीयतेने उपस्थित होते. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक हानिफ मुलानी यांनी सांगितले कि डॉ राजेंद्र ईटकरे हे एक सेवाभावी वृत्तीने सेवा देणारे खऱ्या अर्थाने जनसेवा हिच ईश्वर सेवा आहे या उक्तीप्रमाणे काम करणारे डॉक्टर आहेत हे या शासकीय सेवेतील २५ वर्षांपासून मी पाहतो आहे असे गौरवोद्गार काढले.आणि आपण जनतेला उत्तम सेवा देणे क्रमप्राप्त आहे हे आपण कधीही विसरून चालणार नाही असे उपस्थितांना मार्गदर्शन केले.कामगार नेते आणि कोवीड कालावधीत तालूका समन्वयक  संतोष पवार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की खरोखर  या कोवीड महामारीने भयभीत जनतेला आधाराची गरज होती आणि ती जबाबदारी शासकीय यंत्रणेने आमच्यावर विश्वास ठेवून सोपवीली आणि ती सर्वांच्या सहकार्याने फार पाडत असताना प्रत्येक रूग्ण हा वाचलाच पाहिजे या भावनेतून सेवा देत असताना तालूक्यातील सेवाभावी वृत्तीच्या अनेक विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे योग्य वेळी योग्य सहकार्य मिळाले आणि म्हणूनच काम करणे अधिक शक्य झाले.यावेळी उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष  सुधाकर पाटील, ॲड राजेंद्र मढवी यांनी मनोगत व्यक्त करताना औद्योगिक दृष्ट्या अतीशय प्रगत असलेला तालूका म्हणजे उरण तालूका अशी उरण तालूक्याची ओळख परंतू तालूक्यात सुसज्ज असे एकही मोठे रूग्णालय नसतानाही कोवीड कालावधी संपूर्ण देश जरी लाॅक डाऊन मध्ये होते तरी देशादेशांतर्गत मालाची म्हणजेच अन्न धान्यासह वैद्यकीय साधने सामग्रीसह ईतर अनेक प्रकारच्या मालाची आवक जावक करणारे त्या माध्यमातून या पोर्ट ईंडस्ट्री द्वारे आयात निर्यात करणाऱ्या कामगारांचे काम मात्र सुरूच होते.

जेएनपीटी, शिपींग इंडस्ट्री विविध गोडाऊन कोडिंग - अनलोडींगच्या कामाने दिवस - रात्र प्रभावीत असलेला उरण तालुका असल्यामुळे जागतीक किर्तीच्या या जेएनपीटी बंदरातील कामकाज सुरुच होते.या आपल्या उरण तालुक्यातील जनतेला खरोखर त्याकाळात डॉ . राजेंद्र ईटकरे, उरण तालुका आरोग्य अधिकारी यांनी तत्कालीन तहसीलदार  भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम काम केले.असे मनोगत व्यक्त केले.तत्कालीन वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज भद्रे, तालूका समन्वयक  संतोष पवार, उरण नगरपरिषद आणि उरण तालुक्यातील विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचे कोऑर्डिनेशन सुसंगत असल्यामुळे तसेच तालुक्यातील डॉक्टर्स असोसिएशनच्या माध्यमातून सर्व सदस्यांचे सहकार्य उत्तम मिळाले. या सर्वांना एकत्र करणारे डॉक्टर विकास मोरे डॉ सुरेश पाटील, डॉ सत्या ठाकरे, डॉ घनःश्याम पाटील आणि या सर्व डाॅक्टर्सना मोलाचे मार्गदर्शन करणारे डॉ. प्रफुल्ल सामंत या सर्वांच्या  सहकार्याने तसेच एकजुटीने महाभयंकर कोवीड महामारीवर मात केली तसेच अनेक अडचणींवर मात केली आणि बहुसंख्य नागरिकांचे प्राण वाचले. या वेळी अतिशय जबाबदारीने पार पाडत असताना  डॉ. राजेंद्र ईटकरे यांनी हे आरोग्य सेवेचे कार्य दिवस रात्र करत असताना आपल्या सहकाऱी कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे जपले हे सर्वश्रुत असल्यामुळे ह्या सर्व आठवणींना उजाळा मिळाला आणि हा निरोप समारंभ कार्यक्रम अतीशय ह्रृदयस्पर्शी ठरला.

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!! मुंब...