Tuesday, 27 January 2026

दारू व अंमली पदार्थांच्या व्यसनमुक्ती संदर्भात उरण पोलीस स्टेशन येथे मार्गदर्शन !!

दारू व अंमली पदार्थांच्या व्यसनमुक्ती संदर्भात उरण पोलीस स्टेशन येथे मार्गदर्शन !!

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : प्रजासत्ताक दिनाच्या पावन निमित्ताने उरण पोलीस विभागाच्या सहकार्याने उरण पोलीस स्टेशन येथे जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात दारू व अंमली पदार्थांच्या व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्यरत असलेले दार्शनिक दृष्टीकोनातून काम करणारे दर्शन नाईक व त्यांच्या व्यसनमुक्ती समुदायातील काही सहकारी सहभागी झाले होते.या प्रसंगी दर्शन नाईक यांनी उरण परिसरात वाढत चाललेल्या अंमली पदार्थांचे सेवन, मद्यपानाचे व्यसन तसेच स्क्रीन (मोबाईल/डिजिटल) व्यसन याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. या व्यसनांचा युवकांवर, कुटुंबव्यवस्थेवर आणि सामाजिक सुरक्षिततेवर होणारा परिणाम त्यांनी सविस्तरपणे मांडला.

कार्यक्रमादरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना Alcoholics Anonymous (AA) आणि Narcotics Anonymous (NA) यांसारख्या स्वयं-सहाय्य गटांची माहिती देण्यात आली.व्यसनमुक्तीसाठी उपलब्ध असलेली मदत, बैठकींची रचना, गोपनीयता, तसेच गरजूंना योग्य दिशेने मार्गदर्शन कसे करता येईल याबाबत उपयुक्त माहिती व दृष्टिकोन देण्यात आला.हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलानी यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. तसेच संपूर्ण उरण पोलीस विभागाने दिलेल्या सहकार्याबद्दल व सकारात्मक प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करण्यात आले.अशा प्रकारचे जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्यास व प्रतिबंधात्मक उपाययोजना बळकट करण्यास निश्चितच उपयुक्त ठरतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.श्री किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर झाल्याबद्दल आभार सभा संपन्न !!

राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.श्री किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंज...