Sunday, 4 January 2026

सौ.अलका गणेश भगत यांचा धडाकेबाज प्रचार ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !!

सौ.अलका गणेश भगत यांचा धडाकेबाज प्रचार ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !!

घाटकोपर, (केतन भोज) : प्रभाग क्रमांक १२७ च्या भाजप शिवसेना रिपाई महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.अलका गणेश भगत यांची संपूर्ण प्रभागात आमदार राम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजप महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत जोरदार प्रचार फेरी सुरू असून,याला प्रभागातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद पाठिंबा मिळत आहे. तसेच प्रभाग क्रमांक १२७ मध्ये सौ.अलका गणेश भगत यांची प्रचार फेरीत आणि प्रचारात ही जोरदार आघाडी बघायला मिळत असून, धडाकेबाज प्रचार पहायला मिळत आहे.या प्रचार फेरी दरम्यान सौ.अलका गणेश भगत या प्रभागातील नागरिकांशी त्यांच्या घरोघरी जाऊन संवाद साधत प्रभागाच्या विकासाविषयी चर्चा करत आहेत. तसेच यावेळी प्रभागातील स्थानिक नागरिकांनी ही या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सौ.अलका गणेश भगत यांचे स्वागत केले.

      प्रभाग क्रमांक १२७ च्या भाजप शिवसेना रिपाई महायुतीच्या उमेदवार सौ.अलका गणेश भगत यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक १२७ मध्ये विकासाभिमुख, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन देण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रभाग क्रमांक १२७ चा सर्वांगीण विकास, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांचे वेळेत निराकरण आणि सुशासन हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे यावेळी सौ.अलका गणेश भगत यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...