Sunday, 15 February 2026

विक्रोळी पार्कसाईट वार्ड क्र.१२३ येथील श्री स्वयंभू सोमेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त भव्य धार्मिक कार्यक्रम थाटामाटात संपन्न !!

विक्रोळी पार्कसाईट वार्ड क्र.१२३ येथील श्री स्वयंभू सोमेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त भव्य धार्मिक कार्यक्रम थाटामाटात संपन्न !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
          विक्रोळी पार्कसाईट वार्ड क्र.१२३ येथील श्री स्वयंभू सोमेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त भव्य धार्मिक कार्यक्रम थाटामाटात पार पडला.या पावन प्रसंगी ह.भ.प. गुरुवर्य श्री सुभाष खोडदे महाराज, ह.भ.प. झगडे बुवा तसेच रुद्रांगमनी कु. प्रथमेश पवार यांनी आपल्या कीर्तन व प्रवचनातून उपस्थि भाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शन केले.
            कार्यक्रमाला  ग्राहक संरक्षण कक्ष चे पदाधिकारी कक्ष विधानसभा संघटक श्री.यशवंत विठ्ठल खोपकर,वार्ड संघटक १२३ श्री. संतोष चादे, राजू जाधव, नितेश उतेकर, विजय पांडेय, उमेश गाडगे, नरेश हातिशकर, दत्तगुरु पेडणेकर व संजय कदम आदी मान्यवरांनी  उपस्थित राहून मंदिराचे दर्शन घेऊन कीर्तनाचा लाभ घेतला.यावेळी मंदिराचे अध्यक्ष चंद्रकांत सावर्डेकर, सचिव रामचंद्र मयेकर, खजिनदार प्रकाश सावर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
         श्री.किरण जानवलकर, श्री.संजय जानवलकर, श्री. जनार्दन नाक्ती ,चंद्रकात साटम, श्री. नारायण गावडे,श्री.आप्पासाहेब दाणे,श्री. अनिल अधिकारी, ह.भ.प.श्री. भार्गव झगडे, श्री. सुनिल सावर्डेकर, श्री. रमेश आंबे, श्री. रविंद्र आंबेकर, श्री. सुनिल जाडे, श्री.संदिप साटम,श्री. कृष्णा थोरे, श्रीमती ज्योती भोसले, सौ.अनिता राणे, सौ. अस्मिता अधिकरी, श्रीमती माया साटम, सौ. क्रांती साटम सर्व सदस्य आणि सभासद यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमामुळे परिसरात भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

No comments:

Post a Comment

वाहनचालक अनुज्ञप्तीसाठी स्थानिक वास्तव्य प्रमाणपत्राऐवजी वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक !!

वाहनचालक अनुज्ञप्तीसाठी स्थानिक वास्तव्य प्रमाणपत्राऐवजी वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक !! परिवहन आयुक्...