Monday, 2 February 2026

खोपटा येथे महाविकास आघाडीच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

खोपटा येथे महाविकास आघाडीच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

** महाविकास आघाडीचे उमेदवार पाच हजारांची आघाडी घेणार : महेंद्रशेठ घरत 

उरण दि १, (विठ्ठल ममताबादे) : उरण मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा जोरात प्रचार सुरु असून उरण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत स्वतः मैदानात उतरले आहेत. खोपटा येथे महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी महेंद्रशेठ घरत यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमतांनी निवडून येतील. किमान ५ हजारांची आघाडी मिळेल. कारण गावागावांत महाविकास आघाडीचाच बोलबाला आहे. आमचे उमेदवार सर्वसामान्यांचा आदर करणारे आहेत. मतदारांचा विश्वास ते सार्थ ठरवतील. त्यामुळे मतदारांनी महाविकास आघाडीच्याच उमेदवारांना मतदान करावे असे आवाहन महेंद्र घरत यांनी केले.

यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, उरण नगर पालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर, काँग्रेसचे  सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, डॉ. मनीष पाटील, अँड  अविनाश ठाकूर, अलंकार परदेशी, रुपेश पाटील, संतोष ठाकूर, घनश्याम पाटील, बबन कांबळे, सुरेश पाटील, रमाकांत पाटील, बी. एन. डाकी, प्रमोद म्हात्रे, योगेश पाटील, मनोहर म्हात्रे, तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र कुर्मी समाज द्वारा धीरेंद्र शास्त्री के वक्तव्य का निषेध !!

महाराष्ट्र कुर्मी समाज द्वारा धीरेंद्र शास्त्री के वक्तव्य का निषेध !! महाराष्ट्र कुर्मी समाज ने नागपुर में धीरेंद्र शास्त्री द्...