Thursday, 19 February 2026

यु. ई. एस. स्कूल, ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स ॲण्ड कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी !!

यु. ई. एस. स्कूल, ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स ॲण्ड कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी !!

उरण दि १९, (विठ्ठल ममताबादे) : गुरुवार दिनांक १९-०२-२०२६ रोजी यु. ई. एस. स्कूल, ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स ॲण्ड कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी मध्ये शिवजयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विमला तलाव येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याजवळ विदयार्थी पारंपारिक वेषभूषेत जमले होते. यु. ई. एस. संस्थेच्या ट्रस्टी मेंबर्सनी शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार घातले, त्यानंतर पालखीतील शिवरायांच्या मूर्तीसही पुष्पहार घालून अभिवादन केले व  आठवीच्या विदयार्थ्यांनी शिवगर्जना दिली. त्यांच्यासोबत सिनियर कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या, सिनिअर कॉलेजच्या विभाग प्रमुख तसेच माध्यमिक, प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागातील पर्यवेक्षिका, समन्वयक, पीटीए सदस्य, पालकगण, शिक्षकगण व स्कूल, ज्युनिअर व सिनियर कॉलेजचे सर्व विदयार्थी उपस्थित होते.

यानंतर ढोलताशे व लेझिमच्या लयबद्ध वादयवृंदासह महाराजांच्या पालखीची मिरवणूक यु. ई. एस. स्कूल ॲण्ड कॉलेजच्या दिशेने निघाली. सर्व विदयार्थ्यांनी पारंपारिक वेष परिधान केला होता. त्यातील काही विदयार्थी जिजाऊ व बाल शिवाजींच्या वेशभूषेत आले होते. ह्या सर्व विदयार्थ्यांनी पालखीतील शिवरायांच्या मूर्तीची वाजत गाजत भव्य मिरवणूक पालक मैदानाच्या दिशेने काढली.पालखीचे पालक मैदानात आगमन झाल्यानंतर पालखी सरस्वती मंडपात आणून मिरवणूकीची सांगता करुन पुढील कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.उपस्थित मान्यवरांचे स्वागत केल्यानंतर  माध्यमिक विभागाच्या शिक्षिकेने शिवरायांची महती आपल्या भाषणातून सांगितली. तर आठवीच्या विदयार्थ्यांनी शिवगर्जना दिली. त्यानंतर सरस्वती मंडपातील भव्य व्यासपीठावर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता चौथीच्या विदयार्थ्यांनी महाराजांच्या जीवनावर नृत्य सादर केले तर सिनिअर कॉलेजच्या विदयार्थीनींनी पोवाडा सादर केला. 

सर्व कार्यक्रमाची तयारी, उपस्थितांचे स्वागत, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन यु. ई. एस. परिवारातील शिक्षकांनी सुत्रबध्द पध्दतीने केले. अशा रितीने शिवजयंतीची सांगता राज्यगीताने झाली.

No comments:

Post a Comment

टेंपो चालकाने राजेंद्र घरत यांच्या वाहनाला दिली धडक !!

टेंपो चालकाने राजेंद्र घरत यांच्या वाहनाला दिली धडक !! फोर व्हीलर वाहनाचे आर्थिक नुकसान ; नुकसान भरपाई देण्याची व आरोपी वर कडक कारवाई करण्या...