Wednesday, 18 February 2026

एसटी बस डेपो उरण येथे संत सेवालाल महाराज यांची २६७ वी जयंती साजरी !!

एसटी बस डेपो उरण येथे संत सेवालाल महाराज यांची २६७ वी जयंती साजरी !!

उरण दि १७, (विठ्ठल ममताबादे) : संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे आराध्य दैवत, महान समाज सुधारक आणि अध्यात्मिक गुरु होते.त्यांनी भटक्या बंजारा समाजाला सन्मार्ग दाखवून अंधश्रद्धा अनिष्ट रूढी आणि व्यसनाधीनते विरुद्ध लढा दिला. महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील पोहरागड येथे त्यांची समाधी असून ते अहिंसा आणि मानवतेचे प्रणेते मानले जातात.संत सेवालाल महाराज यांनी शिक्षणाचे व स्वच्छतेचे महत्व सर्वांना पटवून देऊन बळीप्रथा (प्राण्याची हत्या) बंद केली. समाजात दारूबंदी केली. भजनाच्या आवडीमुळे त्यांनी बंजारा बोली भाषेत लोकगीते दोहे भजने रचून उपदेश केला. सत्याने जगणे, प्राण्यावर दया करणे आणि निसर्गाचे रक्षण करणे हे त्यांची शिकवण होती, उपदेश होता आणि त्यांच्या या उपदेशानुसारच  समाजाची वाटचाल सुरू असून त्यांनी सांगितलेल्या मार्गावरच समाज चालत असल्याने समाज प्रगती पथावर आहे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष वामनराव राठोड यांनी व्यक्त केले.

 उरण बस डेपो (आगार) येथे थोर समाज सुधारक संत सेवालाल महाराज यांची २६७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वामनराव राठोड यांनी आपले मत व्यक्त करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे त्यांनी स्वागत सत्कार केले.प्रत्येक व्यक्तीने संत सेवालाल महाराज यांच्या उपदेशानुसार वागले पाहिजे, आचरण केले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्या कार्यक्रम प्रसंगी डी एम बोंद्रे, रोहन खालीपे , खानदेश मित्र मंडळ उरणचे अध्यक्ष प्रकाश चित्ते, कार्याध्यक्ष सुनील चौधरी,संजय पाटील,दिनेश पाटील, गोर बंजारा समाजाचे अबू राठोड, राजेश राठोड,यू. आर.जाधव, विलास चव्हाण, पोलीस कर्मचारी, महिला वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाची रूपरेषा मयूर राठोड यांनी मांडली. अध्यक्ष वामनराव राठोड यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

बल्याणी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर केडीएमसीची धडक कारवाई !!

बल्याणी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर केडीएमसीची धडक कारवाई !! *कल्याण, दि. 23 एप्रिल 2026* कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘अ’...