Thursday, 19 February 2026

प्रथमेश म्हात्रेने वीर वाजेकर महाविद्यालयाचे नाव केले उज्ज्वल !!

प्रथमेश म्हात्रेने वीर वाजेकर महाविद्यालयाचे नाव केले उज्ज्वल !!

मुंबई विद्यापीठाच्या संघाने पटकावले सर्वसाधारण विजेतेपद.

उरण दि १९, (विठ्ठल ममताबादे) :
रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील वीर वाजेकर आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयाचा विद्यार्थी  प्रथमेश सदानंद म्हात्रे (M.Sc. Zoology) याने JSS Academy of Higher Education and Research, म्हैसूर विद्यापीठ येथे दिनांक ९ ते १३ फेब्रुवारी २०२६ दरम्यान AIU आयोजित ३९ व्या आंतरविद्यापीठ साउथ वेस्ट झोन युवा महोत्सव "युवोत्सव-२०२६" मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाचे नाव देशपातळीवर झळकवले.या महोत्सवात प्रथमेशने मातीकाम (Clay  Modeling) स्पर्धेत तृतीय क्रमांक (कांस्य पदक ) पटकावला, तर पोस्टर मेकिंग स्पर्धेत चतुर्थ स्थान मिळवले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबई विद्यापीठाने या महोत्सवात सर्वसाधारण विजेतेपद (Overall Championship) मिळवले, ज्यात प्रथमेशचे योगदान मोलाचे ठरले. 

या अभूतपूर्व यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा माजी खासदार लोकनेते  रामशेठ ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष  पी. जे. पाटील, कॉलेज विकास समितीचे अध्यक्ष बाळाराम पाटील,कॉलेज विकास समितीचे भावना घाणेकर, कॉलेज विकास समितीचे सदस्य व माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष सुधीर घरत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सुजाता पाटील तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक व सदस्यांनी प्रथमेशचे मनःपूर्वक अभिनंदन केले.प्रथमेशच्या या यशाने संपूर्ण महाविद्यालय परिवारात आनंदाचे वातावरण पसरले असून विद्यार्थ्यांमध्ये नवी स्फूर्ती निर्माण झाली आहे

No comments:

Post a Comment

टेंपो चालकाने राजेंद्र घरत यांच्या वाहनाला दिली धडक !!

टेंपो चालकाने राजेंद्र घरत यांच्या वाहनाला दिली धडक !! फोर व्हीलर वाहनाचे आर्थिक नुकसान ; नुकसान भरपाई देण्याची व आरोपी वर कडक कारवाई करण्या...