दूरदृष्टिचे अंदाजपत्रक - रविंद्र माणगावे, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चर !!
महाराष्ट्राचे अंदाजपत्रक सादर करतांना मुख्यमंत्री व अर्थ मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यकालिन विकासाच्या अनुषंगाने विचार केल्याचे जाणवते. उद्योग ४ पिढी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या काळातही राज्याची प्रगती कशी होईल हा विचार यामागे असल्याचे जाणवते. महाराष्ट्र हे "नाविन्यता उद्योग राजधानी "असल्याने "ए आय आयुक्तालय " निर्माण करणे, सुक्ष्म व लघु उद्योग विकासाकरीता प्रत्येक जिल्ह्यात खास केंद्रे आणि कौशल्य विकासाला प्रोत्साहन यासारख्या तरतुदी अत्यंत महत्वाच्या आहेत. महाराष्ट्र चेंबरने "गाव तेथे उद्योजक " हे मिशन स्वीकारले असून त्याला एक पाठबळ यातून मिळत आहे. या अंदाजपत्रकाचे स्वागत !
वृत्त - राहुल बैसाणे
No comments:
Post a Comment