Friday, 6 March 2026

आदर्श शासकीय कर्मचारी - अपर्णा पंकज तांडेल.

आदर्श शासकीय कर्मचारी - अपर्णा पंकज तांडेल.

स्त्री म्हटली कि अनेक भूमिका आल्या मुलगी,बहीण,पत्नी, आई, सासू अशा अनेक भूमिका एका स्त्रीला निभवाव्या लागतात.अशीच एक आदर्श भूमिका निभावत आहेत त्या उरण तालुक्यातील चिरनेर गावातले विदयुत वायरमन कै. नरेश रामा ठाकूर यांची जेष्ठ कन्या अपर्णा नरेश ठाकूर. वडिलांचा मृत्यू नंतर त्यांच्या जागेवर महावितरण  जसखार शाखेत कार्यरत असलेल्या अपर्णा नरेश ठाकूर यांनी SSC शिक्षण पूर्ण केले. नंतर Electric ITI केले.लग्नानंतर  सौ. अपर्णा पंकज तांडेल या नावाने त्या सर्वांना परिचित झाल्या. सध्या ते वरिष्ठ तंत्रद्य म्हणून पदावर कार्यरत आहेत.त्या एक उत्तम गृहिणी, एक उत्तम सरकारी कर्मचारी आहेत.एक मुलगा त्याची सकाळी ७ ची शाळा, नवरा ओएनजीसी न्हावा येथे कामाला आहे. घरातली तयारी, दोघांचे डब्बे, घरातला काम आवरून स्वतःची नोकरी सांभाळतात , त्यातच अपर्णा या वसुली पथकात असल्याने रोज प्रत्येक गावात जाऊन महाविरणच्या ग्राहकांना भेटते. व भेटून वसुली करते. अपर्णा यांना कामावर असताना विविध समस्यांना सामोरे जावे लागते.पण त्या कधीही निराश झालेल्या नाहीत.वेळच्या वेळी दिलेली वसुली यादी नेहमी पूर्ण करतात, घरी आल्यावर कामाचा ताण -तणाव घराच्या बाहेर ठेवायचं या तत्वाने त्या वागतात.अपर्णा नरेश ठाकूर उर्फ सौ. अपर्णा पंकज तांडेल व श्री पंकज पंढरीनाथ तांडेल ही आदर्श पती पत्नीची जोडी आहे. अपर्णा यांच्या पाठीशी त्यांच्या सुख दुःखात त्यांचे पती पंकज तांडेल (चिरनेर उरण )हे नेहमी उभे असतात. त्यांचे नेहमी सहकार्य असते.एक आदर्श पत्नी, एक आदर्श आई म्हणून त्या सर्वांना परिचित आहेत. अपर्णा यांचा कुटुंबाला अभिमान वाटतो. घरात असताना व घराबाहेर शासकीय कर्मचारी म्हणून कार्यरत असताना एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून जनता त्यांच्याकडे पाहते.


शब्दांकन / लेखन - विठ्ठल ममताबादे, उरण

No comments:

Post a Comment

विरारच्या उत्कर्ष विद्यालयात दुमदुमला मराठी भाषेचा जागर !!

विरारच्या उत्कर्ष विद्यालयात दुमदुमला मराठी भाषेचा जागर !! विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण 'भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असतं...