Tuesday, 7 April 2026

ओएनजीसी तर्फे ग्रामपंचायत नवघरला नवीन घंटागाडी उपलब्ध !!

ओएनजीसी तर्फे ग्रामपंचायत नवघरला नवीन घंटागाडी उपलब्ध !!

उरण दि ७, (विठ्ठल ममताबादे) : ग्रामपंचायत नवघर तर्फे ओएनजीसी कंपनीला घनकचरा उचलण्यासाठी घंटागाडीची मागणी दोन महिन्यापूर्वी ग्रामपंचायत तर्फे मागणी व ठराव सरपंच आणि उपसरपंच यांनी ओएनजीसीला केला होता शिवसेना शाखाप्रमुख  अविनाश म्हात्रे आणि नितीन मढवी यांनी भेटून विनंती केली की आम्हाला घंटागाडीचे खूप आवश्यकता आहे आपण लवकरात लवकर घंटा गाडीच्या मागणीचा विचार करावा अशी विनंती करण्यात आली.त्यानंतर त्यांनी संस्थेचे कॉन्टॅक्ट नंबर देऊन त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना जे काही पत्र किंवा माहिती पाहिजे सर्व देऊन त्यांनी पण आश्वासित केले होते की तुमच्या मागणीचा लवकरात लवकर विचार केला जाईल. एनजीओ संस्था आणि ओएनजीसी अधिकारी यांच्या सोबत शाखाप्रमुख  अविनाश म्हात्रे यांनी  स्वतः सतत पाठपुरवठा, संपर्क केला. त्यांनी ग्रामपंचायतला नवीन एक चांगली घंटागाडीची व्यवस्था करून दिली.सोमवार दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी ओएनजीसी कंपनी मध्ये या घंटागाडीचे उद्घाटन ओएनजीसी चे प्लांट मॅनेजर  एस एन अहमद सर(CGM) आणि एस के मोहन  सपोर्ट मॅनेजर उरण प्लांट यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले. यावेळी ओएनजीसी चे अधिकारी  अभिषेक पाटील  आणि इतर अधिकारी उपस्थित होते. तसेच सरपंच  सविता मढवी,उपसरपंच  प्रियदर्शनी म्हात्रे, नितीन मढवी, शाखाप्रमुख अविनाश म्हात्रे, आतिश भोईर उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायतीतर्फे उद्घाटनाला आलेल्या ओएनजीसी अधिकारी यांचे शाल व फुलझाडे देऊन स्वागत करून सत्कार करण्यात आले.ही घंटागाडी उपलब्ध होण्यासाठी ओएनजीसीचे अधिकारी अभिषेक पाटील यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांचे विशेष सत्कार करून ग्रामपंचायत तर्फे आभार मानण्यात आले.तसेच भूमिका फाउंडेशनचे डॉक्टर विशाल गणर यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य लाभले. शिवसेना शाखाप्रमुख  अविनाश म्हात्रे यांनी ओएनजीसी अधिकारी आणि एनजीओ संस्थेशी सतत पाठपुरवठा संपर्क करून ओएनजीसी कडून ही नवीन घंटागाडी मिळण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल ग्रामपंचायतीतर्फे त्यांचे सुद्धा  मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

No comments:

Post a Comment

वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी उपायुक्तांनी केली प्रत्यक्ष पाहणी !!

वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी उपायुक्तांनी केली प्रत्यक्ष पाहणी !! कल्याण, प्रतिनिधी : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे  घ...