Sunday, 26 April 2026

"सिद्धार्थ महाविद्यालयात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव यशस्वीरीत्या संपन्न" !!

"सिद्धार्थ महाविद्यालयात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव यशस्वीरीत्या संपन्न" !!

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पुढाकाराने महात्मा ज्योतिबा फुले व परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव महोत्सव  शनिवार दि.२५/४/२०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत महाविद्यालयात वेगळ्या पद्धतीने व अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. पाच तासांच्या भरगच्च कार्यक्रमात शिक्षक, कर्मचारी व त्यांच्या लहान‌ मुलांचे नृत्य, गाणी इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमासह, निमंत्रित मान्यवरांचे व्याख्यान व माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार अशा विविध कार्यक्रमांचा समावेश होता. तसेच सर्वांसाठी उत्तम स्नेह भोजनाची व्यवस्थाही केली होती.

कार्यक्रम सकाळी ठीक १० वाजता सुरू झाला. सर्वप्रथम भगवान गौतम बुद्ध,महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज,राजर्षी शाहु महाराज, माता रमाई व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुलें व अन्नाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार व फूले वाहून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सन्माननीय पाहुणे, माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात झाली. यामध्ये काही कर्मचाऱ्यांनी बाबासाहेबांना गाण्यातुन अभिवादन केले. काही लहान मुलांनी गाणी, नृत्य व भाषणातून महामानवाच्या कार्याची थोरवी सादर केली.

तसेच कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त आयु. अरविंद सोनटक्के साहेब (IRS) व विशेष अतिथी म्हणून ऍड. बी. के. बर्वे साहेब यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण केली. सोनटक्के साहेबांनी २२ प्रतिज्ञा प्रचार व प्रसार अभियान प्रकल्प जो, ते अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये राबवत आहेत व त्याला लोकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे, यांचे उदाहरणासह दाखले दिले.  तसेच त्यानी पृथ्वी दिवस व सायन्स दिवस साजरे करून लोकांमध्ये त्यांच्या जगण्यात शास्त्रीय दृष्टिकोन बाळगला पाहीजेत, जेणेकरून चुकीच्या रूढी, परंपरा व अंधश्रद्धेपासून लोक मुक्त होतील. तसेच प्रभारी प्राचार्य डॉ विष्णु भंडारे यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे काम अत्यंत निष्ठेने, सचोटीने व प्रामाणिकपणे करावे असा संकल्प महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने करावा असे आवाहन केले.

कार्यक्रमच्या उत्तम नियोजनासाठी प्रभारी प्राचार्याच्या नेतृत्वाखाली सर्वांनीच आपापल्या पद्धतीने मनापासून सहभाग दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य प्रा. संजयकुमार बोरसे व डॉ सुनील गायकवाड यांनी संयुक्तपणे केले व शेवटी उपप्राचार्य डॉ. समीर ठाकूर यांनी सर्वांचे आभार मानले. सर्वच चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांनी मुकादम आयु. प्रकाश मोहिते व युवराज मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसांपासून हॉलची व बाहेरील सजावटीसाठी भरपूर कष्ट घेतले, तसेच स्नेहभोजनाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ही प्रा. विशाल करंजवकर, साक्षी गायकवाड,मंगेश कदम यांनी बारकाईने व उत्तम प्रकारे हाताळली, हे सर्वजन निश्चितच कौतूकास पात्र आहेत. 
 

वृत्त/सौजन्य -
*-डॉ. विष्णु भंडारे (प्रभारी प्राचार्य)*

No comments:

Post a Comment

कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सव २०२६ हा पणन मंडळाचा स्तुत्य उपक्रम- राहूल सोलापूरकर !!

कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सव २०२६ हा पणन मंडळाचा स्तुत्य उपक्रम- राहूल सोलापूरकर !! महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळार्फत आयोजित क...