Friday, 1 May 2026

कल्याण-डोंबिवलीतील अ प्रभाग क्षेत्रात अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई !

कल्याण-डोंबिवलीतील अ प्रभाग क्षेत्रात अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई !

कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रात अनधिकृत बांधकामांविरोधात मोठी आणि धडक कारवाई करण्यात आली. आयुक्त अभिनव गोयल यांच्या आदेशाने सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई राबवण्यात आली असून यावेळी १५० तयार खोल्यांचे बांधकाम आणि ७० हून अधिक जोते जमीनदोस्त करण्यात आली.

ही कारवाई स्थानिक नगरसेवक राहुल मुकुंद कोट यांच्या तक्रारीची दखल घेऊन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वारंवार सातत्याने तक्रार करूनही पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आल्याची तक्रार नगरसेवकांनी थेट आयुक्तांकडे केली होती.

महापालिकेच्या या अचानक आणि कठोर कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाच्या भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.

जमीनदोस्त करण्यात आलेल्या दीडशेहून अधिक खोल्या ह्या नवीनच तयार झाल्याचे दिसून येत होते त्यामुळे खोल्या तयार होताना प्रशासन काय करत होते असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात खोल्या तयार होत असताना प्रशासनाला खबर का लागली नाही असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

No comments:

Post a Comment

कालप्रवाह पुस्तकाचे प्रकाशन आणि निर्भीड जागल्या पुरस्काराचे वितरण !!

कालप्रवाह पुस्तकाचे प्रकाशन आणि निर्भीड जागल्या पुरस्काराचे वितरण !! मुंबई, पी. डी. पाटील (दि. २८/०४/२०२६) : मराठी वृत्तपत्र लेख...