माळशेज घाटात दोन कारच्या भीषण धडकेत 4 जण जखमी; दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान !!
*माळशेज, प्रतिनिधी* : माळशेज घाटातील आंब्याच्या वळणाजवळ समोरासमोर दोन कारच्या भीषण धडकेत 4 जण जखमी झाले आहेत. या अपघात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
उल्हासनगर येथून इर्टिगा कारने आपल्या गावी अहिल्यानगरला जात असताना पंढरीनाथ दहातोंडे व वाहनचालक रंजन जाधव हे सोमवारी माळशेज घाटातील आंब्याच्या वळणावर पोहोचले. यावेळी समोरून येणाऱ्या हरीश अमजद पठाण या २१ वर्षांच्या तरुणाने अत्यंत बेपर्वाईने भरधाव वेगात कार चालवत आपली लेन सोडून विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये प्रवेश करून इर्टिगाला जोरदार धडक दिली.
अपघाताची तीव्रता जास्त असतानाही चालक रंजन जाधव यांनी प्रसंगावधान राखत गाडी नियंत्रणात ठेवल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र या धडकेत दोन्ही वाहनांतील 4 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
*चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात*
या अपघातात समोरून येणाऱ्या हरीश अमजद पठाण याने निष्काळजी व धोकादायक पद्धतीने वाहन चालविल्याने हा अपघात घडला, असा आरोप इर्टिगाचे चालक रंजन जाधव व प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. अशा प्रकारे वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्रत्येकदर्शी यांच्या सांगण्यानुसार व रंजन जाधव यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
No comments:
Post a Comment