Monday, 20 July 2026

दहा लाख ९० हजार रुपये किमंतीच्या दागिन्यासह आरोपी अटक, उल्हासनगर क्राईम ब्रॅंच ची कामगिरी !!

दहा लाख ९० हजार रुपये किमंतीच्या दागिन्यासह आरोपी अटक, उल्हासनगर क्राईम ब्रॅंच ची कामगिरी !!
 
उल्हासनगर , दि . १९ प्रतिनिधी : उल्हासनगर क्राईम ब्रॅंच ने उल्लेखनिय कामगिरी करत भायखळा येथे सोन्याच्या दागिन्याची चोरी करणाऱ्या आरोपीला अटक केली असुन त्याच्या कडुन १० लाख ९० हजार रुपये किमंतीचे ८६ ग्रॅम सोने हस्तगत केले आहे. 

उल्हासनगर क्राईम ब्रॅंच चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश गज्जल यांना मिळालेल्या माहीतीनूसार एक जण सेंच्युरी रेयॉन कंपनी शहाड येथे येणार आहे. तेव्हा गज्जल यांनी आपल्या सहकाऱ्यासह त्या परिसरात सापळा लावला. तेव्हा एक तरुण त्यांना त्या ठिकाणी संशयास्पद फिरताना दिसुन आला. त्याला ताबडतोब ताब्यात घेत क्राईम ब्रॅंच कार्यालयात आणुन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे चोरी केलेल्या सोन्याच्या चेन आढळुन आल्या.सदर चेन ८६ ग्रॅम वजनाच्या असुन त्यांची बाजार भावाप्रमाणे १० लाख ९० हजार रुपये किमंत असल्याचे पोलिसानी सांगितले. या दागिन्याची चोरी मुंबई येथील भायखळा येथुन केल्याची कबुल आरोपी गुलाम नबी शेख याने दिली आहे. दरम्यान या गुंह्याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश गज्जल यांनी भायखळा पोलिसांशी संपर्क साधुन पुष्ठी केले असुन आरोपीला त्यांच्या ताब्यात दिले आहे .

No comments:

Post a Comment

रायगडमधील साहित्यिकांची आषाढीला साहित्य वारी निघते हा रायगडाचा अभिमान..!ॲड.गोपाळ शेळके

रायगडमधील साहित्यिकांची  आषाढीला साहित्य वारी निघते हा रायगडाचा अभिमान..! ॲड.गोपाळ शेळके  उरण दि १९, (विठ्ठल ममताबादे) : रायगडमध...