Sunday, 26 July 2026

आषाढी एकादशी निमित्ताने वंचित बहुजन आघाडी शिवडी तालुका वतीने मोफत शैक्षणिक साहित्य वाटप !!

आषाढी एकादशी निमित्ताने वंचित बहुजन आघाडी शिवडी तालुका वतीने मोफत शैक्षणिक साहित्य वाटप !!

*वंचित बहुजन आघाडी – शिवडी तालुका यांच्यातर्फे मोफत शैक्षणिक साहित्य वाटप*

शिवडी मुंबई (सचिन ननगरे) : आषाढी एकादशी निमित्ताने परिवार साफल्य हाऊसिंग सोसायटी बाहेर, दा. ग. महाजनी पथ, शिवडी मुंबई येथे वंचित बहुजन आघाडी, शिवडी तालुका वॉर्ड क्र. २०२ यांच्या वतीने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पेन, पेन्सिल, इरेझर व शार्पनर अशा  शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. 

कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे मुंबईतील पदाधिकारी चेतन अहिरे मुंबई अध्यक्ष, समीर कांबळे मुंबई महासचिव बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन गुणवंत भालेकर, प्रतीक जाधव, महेश तांबे, संजय भालेराव, सुभाष काळे, प्रदीप गुलाबराव जाधव, सुमेर खरे, ॲड. विकास गांगुर्डे, सतीश गांगुर्डे, वेदांत पागडे, वैशाली विजय भालेराव, महेश्वरी तांबे, श्रद्धा भालचंद्र जाधव,उज्वला काळे आणि वैशाली गुणवंत भालेकर वंचित बहुजन आघाडी, शिवडी तालुका यांच्या वतीने करण्यात आले.

No comments:

Post a Comment

साई ट्रस्ट विद्यालयात रंगला भक्तीचा मळा !!

साई ट्रस्ट विद्यालयात रंगला भक्तीचा मळा !! उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे) : साई ट्रस्टचे अध्यक्ष नरसू पाटील सर यांच्या मार्गदर्शना...