Wednesday, 22 July 2026

ठाणे महानगरपालिकेची अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्सवर धडक कारवाई !!

ठाणे महानगरपालिकेची अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्सवर धडक कारवाई !!

*दिवसभरात 135 ठिकाणी कारवाया*  

*ठाणे, प्रतिनिधी*

ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाने विशेष मोहिमेअंतर्गत शहरातील विविध प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत पोस्टर्स आणि बॅनर्स हटविण्याची व्यापक कारवाई केली.

*प्रभागनिहाय कारवाया*  
दिवसभरात एकूण 135 कारवाया करण्यात आल्या. त्यामध्ये  
*दिवा प्रभाग समिती*: 78  
*लोकमान्य सावरकरनगर*: 16  
*नौपाडा-कोपरी*: 12  
*वर्तकनगर*: 11  
*माजीवडा-मानपाडा*: 11  
*वागळे प्रभाग*: 7  
अशा कारवाया करण्यात आल्या.

*नियमित कारवाईचा इशारा*  
शहर विद्रूपीकरणाला आळा घालण्यासाठी महानगरपालिका अशा प्रकारची कारवाई नियमितपणे सुरू ठेवणार आहे. अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स आणि जाहिराती लावणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

कागदावरच कारवाई; रस्त्यावर फेरीवाल्यांची दादागिरी व प्रभागात ठिकठिकाणी अनअधिकृत बांधकाम !!

कागदावरच कारवाई; रस्त्यावर फेरीवाल्यांची दादागिरी व प्रभागात ठिकठिकाणी अनअधिकृत बांधकाम !! .             समाजसेवक व माहिती अधिका...