Tuesday, 7 July 2026

"स्मार्ट सिटीचे स्वप्न की पाण्याचे संकट? उरणच्या पूरस्थितीवर अलंकार कडू यांचा प्रशासनाला थेट सवाल!" !!

"स्मार्ट सिटीचे स्वप्न की पाण्याचे संकट? उरणच्या पूरस्थितीवर अलंकार कडू यांचा प्रशासनाला थेट सवाल!" !!

** उरणचा विनाशकारी पाऊसः ३५ वर्षांची जुनी 'पाणी वाट' आणि प्रशासकीय ढिसाळपणाचा बळी  ; विविध उपाय योजना करण्याची  मागणी.


उरण दि ७, (विठ्ठल ममताबादे) :
रात्रीच्या वेळी डोळ्यासमोर आपल्या हक्काचे घर, संसार आणि आयुष्यभराची पुंजी पाण्याखाली जात असताना, एका बापाची होणारी घालमेल तुम्ही कधी अनुभवली आहे का ? पावसाच्या पाण्याचा आवाज आता शांततेचा संदेश देत नाही, तर तो उद्याच्या विनाशाची चाहूल देतोय. कालपर्यंत ज्या मातीत आपली मुले खेळली, तिथे आज साचलेल्या घाण पाण्यामुळे आजारांचे सावट आहे. उरणमध्ये अवघ्या काही तासांच्या पावसाने शेकडो घरांमध्ये पाणी शिरले आणि सामान्य नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. हे फक्त साचलेले पाणी नाही, तर ही प्रशासनाच्या अनास्थेची आणि मानवनिर्मित चुकांची 'तीव्र प्रतिक्रिया' आहे.असे परखड आक्रमक व स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते तथा पर्यावरण प्रेमी अलंकार कडू यांनी व्यक्त केले आहे.

३५ वर्षापूर्वीचे नियोजन आणि आजची भीषण वास्तवता यात खूपच फरक आहे.गेल्या चार दशकांपूर्वी उरणची भौगोलिक स्थिती आणि लोकवस्ती लक्षात घेऊन पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नैसर्गिक ओढे आणि नाले निश्चित करण्यात आले होते. पाऊस पडला की तो ओक्रयातून खाडीत आणि खाडीतून समुद्रात जाणे हे निसर्गाचे चक्र होते. मात्र, आज ३५-४० वर्षांनंतरही आपण त्याच जुन्या नियोजनावर अवलंबून आहोत.

शहराचा विस्तार झाला, पण पाण्याचा मार्ग मात्र अरुंद झाला. उरणमध्ये मोठ्या औद्योगिक प्रकल्पांची निर्मिती करताना त्यांच्या अंतर्गत रस्त्यांनी, भिंतींनी आणि बांधकामांनी पावसाच्या पाण्याचे हे नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे बाचित वेन्ले आहेत. पाणी वाहून जाण्याच्या वाटा आपण मोकळ्या ठेवल्याच नाहीत, मग पूर येणार नाही तर काय होईल ? असा सवाल अलंकार कडू यांनी उपस्थित केला आहे.

विकासाचा हव्यास की विनाशाचा मार्ग यावर बोलताना अलंकार ठाकूर यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे.उरणमध्ये अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आल्या, ज्यांनी उरणच्या अर्थव्यवस्थेला गती दिली असेल, पण त्या बदल्यात येथील स्थानिक ग्रामस्थांना काय मिळाले ? दरवर्षी पावसाळ्यात आपल्याच घरात गुडघाभर पाणी साचलेले पाहणे, हेच नशिबी आले आहे का ? आपण प्रगतीच्या नावाखाली 'स्मार्ट सिटी आणि 'औद्योगिक हब'ची स्वप्ने पाहतोय, पण ज्या शहरात पावसाचे पाणी सुरक्षितपणे समुद्रापर्यंत पोहोचू शकत नाही, तिथे आपण 'प्रगती' केली आहे की 'विनाश' ओढवून घेतलाय ? जर निसर्गाचा कोप वाढला आणि जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले, तर मग आपल्या या सिमेंटच्या इमारती आणि कंपन्यांचा नफा आपल्याला वाचवाचला येतील का ? आता तरी जागे व्हा!

पाण्याचे नैसर्गिक मार्ग अडवून किंवा बुजवून केलेले हे बांधकाम आजच्या पूरस्थितीला जबाबदार आहे. जर आपण आताच आपल्या लोकप्रतिनिधींना आणि प्रशासनाला जाब विचारला नाही, तर येणारी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही, प्रशासनाने आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.नैसर्गिक प्रवाहांचे सर्वेक्षण केले पाहिजे.उरणमधील सर्व बंद झालेले ओढे आणि नाले तातडीने मौकळे करणे.कंपन्यांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे.ज्या प्रकल्पांमुळे पाण्याचे मार्ग बंद झाले आहेत, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून पर्यायी जलवाहिन्यांची युद्धपातळीवर निर्मिती करणे.भविष्यातील नियोजन केले पाहिजे केवळ काँक्रीटवर भर न देता, पावसाच्या पाण्याचा निचरा होईल अशी आधुनिक ड्रेनेज सिस्टिम विकसित करणे आदी उपाय या समस्यावर करता येतील.

उरणचा विकास होत असताना तो इथल्या सामान्य नागरिकांच्या जीवावर उठणारा नसावा. आज उरणचे गावकरी जो फटका सहन करत आहेत, तो पुन्हा होऊ नये, यासाठी आता केवळ चर्चा नको, तर ठोस कारवाई हवी.विकास लोकांचा व्हावा, केवळ कागदावरचा नको! असे परखड व स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment

"स्मार्ट सिटीचे स्वप्न की पाण्याचे संकट? उरणच्या पूरस्थितीवर अलंकार कडू यांचा प्रशासनाला थेट सवाल!" !!

"स्मार्ट सिटीचे स्वप्न की पाण्याचे संकट? उरणच्या पूरस्थितीवर अलंकार कडू यांचा प्रशासनाला थेट सवाल!" !! ** उरणचा विनाशकारी पाऊसः ३५...