महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा पदग्रहण सोहळा मुंबईत; मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री पाटील प्रमुख पाहुणे !!
*अध्यक्ष रविंद्र मानगावे, व्यवस्थापन व कार्यकारिणी मंडळाचा पदग्रहण*
*मुंबई, (राहुल बैसाणे)
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर MACCIA च्या वर्ष 2026-2028 च्या नवनिर्वाचित अध्यक्ष रविंद्र मानगावे, व्यवस्थापन मंडळ व कार्यकारिणी मंडळाचा भव्य पदग्रहण सोहळा शनिवार, 4 जुलै 2026 रोजी मुंबईत होणार आहे. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम पार पडेल.
*प्रमुख उपस्थिती*
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारत सरकारचे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील उपस्थित राहणार आहेत.
*दिग्गज मंत्र्यांची उपस्थिती*
कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार उपस्थित राहतील. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत, माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, कामगार मंत्री आकाश फुंडकर आणि गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर हेही सहभागी होतील.
आमदार राहुल आवाडे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अमरीशभाई पटेल, आमदार बाबुराव कदम कोहलीकर आणि आमदार सत्यजित देशमुख हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. चेअरमन ट्रस्ट बोर्ड आशिष पेडणेकर आणि तत्कालीन माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा यांचीही उपस्थिती असेल.
*नवे नेतृत्व स्वीकारणार जबाबदारी*
या सोहळ्यात नवनिर्वाचित अध्यक्ष रविंद्र मानगावे, वरिष्ठ उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्षा डॉ. धनश्री हरदास, उपाध्यक्ष किरण भोसले, उपाध्यक्षा सुनीता फाल्गुने, महेंद्र कैलास अग्रवाल, उपाध्यक्ष संतोष राणे, उपाध्यक्ष सुनिल किर्दक, उपाध्यक्ष सर्जेराव नलावडे, उपाध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष सिद्धार्थ रूहाटीया, व्यवस्थापन समितीत निमंत्रित सदस्य वेदांशू पाटील यांच्यासह नवीन कार्यकारिणी सदस्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न होईल.
'गाव तिथे उद्योजक' या संकल्पनेला बळ देणारा हा सोहळा चेंबरच्या 100 वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
No comments:
Post a Comment