आंबिवली बल्याणी रस्त्यावरील खचलेल्या रस्त्याची महापौरांकडून पाहणी !!
** कायमस्वरूपी स्लॅब कलव्हर्ट उभारण्याची मागणी
कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ अंतर्गत बल्याणी गावात मुसळधार पावसामुळे खचलेल्या पाईप कलव्हर्ट व रस्त्याची आज महापौर सौ. हर्षाली चौधरी, महानगरपालिकेचे शहर अभियंता, संबंधित अभियंते उप अभियंते महापालिका अधिकारी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे (NHAI) प्रतिनिधी आणि स्थानिक नगरसेवक व नागरिकांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष खचलेल्या रस्त्याची पाहणी करण्यात आली. कल्याण डोंबिवली आंबिवली कल्याणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने महानगरपालिकेने आतडीने खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामालाही सुरुवात करण्यात आली.
या पाहणीदरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून केवळ तात्पुरती दुरुस्ती न करता, त्या ठिकाणी कायमस्वरूपी स्लॅब कलव्हर्ट उभारण्यात यावा, अशी ठाम मागणी नगरसेवक कु. राहुल मुकुंद कोट आणि नगरसेविका सौ. तेजश्री हेमंत गायकवाड यांनी केली. यावर पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHI आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या संयुक्त माध्यमातून कायमस्वरूपी उपाययोजना करून कलवर टाकण्याचे काम तातडीने सुरू करण्यात येईल, असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले.
याशिवाय मुंबई–वडोदरा महामार्गाच्या कामामुळे बाधित झालेल्या डी.पी. रस्त्याच्या प्रश्नावरही लवकरच महापालिका मुख्यालयात संयुक्त बैठक घेऊन आवश्यक निर्णय व कार्यवाही केली जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
बल्याणी, ऊंभर्णी आणि मोहिली परिसरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांसह विविध विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, असा विश्वास नगरसेवक राहुल कोट आणि तेजश्री गायकवाड यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment