Wednesday, 8 July 2026

कल्याण डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील नगरसेवक रमेश म्हात्रें यांचे मारहाण प्रकरण ; 4 जणांना अटक !!

कल्याण डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील नगरसेवक रमेश म्हात्रें यांचे मारहाण प्रकरण ; 4 जणांना अटक !!

*डोंबिवली, दि. ०८ जुलै २०२६, विनोद गीरी 

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात धुडगूस घालत शिंदेसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी महिला डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिसांनी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह चौघांना अटक केली आहे.

*रुग्णालयात काय घडले?*  
मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी रुग्णालयात दोन डॉक्टर, दोन नर्स आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

*पोलिसांची कारवाई*  
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला तिघांना अटक केली होती. मात्र विरोधकांनी आणि स्थानिकांनी संताप व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनाही अटक केली.

घटनेचा पुढील तपास विष्णुनगर पोलीस करत आहेत.

No comments:

Post a Comment

*" पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८१वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा "*

*" पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८१वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा "* महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ८ ज...