Monday, 6 July 2026

बारवी धरणाची पाणीसाठा स्थिती अद्याप चिंताजनक !!

बारवी धरणाची पाणीसाठा स्थिती अद्याप चिंताजनक !!

धरणात केवळ ३०.०६ टक्के जलसाठा

कल्याण संदीप शेंडगे, दि. ६ जुलै : कल्याण-डोंबिवलीसह ठाणे परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणातील पाणीसाठा अद्याप समाधानकारक पातळीवर पोहोचलेला नाही. ६ जुलै २०२६ रोजीच्या आकडेवारीनुसार धरणात केवळ ३०.०६ टक्के पाणीसाठा असून उपलब्ध पाणीसाठा १०९.८८ दशलक्ष घनमीटर इतका आहे.
सध्या धरणाची पाणीपातळी ६०.१८ मीटर असून धरणाची ओव्हरफ्लो पातळी ७२.६० मीटर आहे. आजपर्यंत धरण क्षेत्रात १४७.८० मिमी पावसाची नोंद झाली असून हंगामातील एकूण सरासरी पाऊस ६२८.०० मिमी इतका झाला आहे.

मागील वर्षी याच दिवशी (६ जुलै २०२५) बारवी धरणात ६३.४३ टक्के पाणीसाठा होता. त्यावेळी धरणाची पाणीपातळी ६७.८० मीटर तर उपलब्ध पाणीसाठा २१४.२८ एम सी एम इतका होता. तसेच त्या कालावधीत धरण क्षेत्रात ९८१७.०० मिमी पावसाची नोंद झाली होती.
यंदा मागील वर्षाच्या तुलनेत धरणातील पाणीसाठा लक्षणीयरीत्या कमी असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत चांगल्या पावसाची आवश्यकता असून बारवी धरणातील जलसाठ्यावर नागरिकांसह प्रशासनाचेही लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

शास्त्रीनगर रुग्णालयातील मारहाण प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !!

शास्त्रीनगर रुग्णालयातील मारहाण प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !! .       (सहायक पोलिस आयुक्त, डोंबिवली - सुहास हेम...