स्व. वसंतराव नाईक यांच्या 113 व्या जयंतीनिमित्त मोहने येथे 'विद्यार्थी गुणवंत गौरव सोहळा 2026' !!
*आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार*
*मोहने, (संदीप शेंडगे) :
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे जनक, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. वसंतराव नाईक साहेब यांच्या 113 व्या जयंतीनिमित्त मोहने येथे संत सेवालाल महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने 'विद्यार्थी गुणवंत गौरव सोहळा 2026' आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नरेंद्र पवार उपस्थित होते.
*गुणवंतांचा सत्कार*
यावेळी बंजारा समाजातील इयत्ता 10 वी, 12 वी तसेच पदवीधर गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिक्षण हे समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचे प्रभावी माध्यम आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देणारे असे उपक्रम समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि समाजाला नवी दिशा मिळते, असे आमदार पवार म्हणाले.
*मान्यवरांची उपस्थिती*
कार्यक्रमाला राष्ट्रीय बंजारा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भिकनजी जाधव, राष्ट्रीय कार्याध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रीय बंजारा टायगर्स प्रदेशाध्यक्ष सतीश राठोड उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष अंबादास पंडित राठोड, उपाध्यक्ष पोपट राठोड, सचिव सुनील जाधव, खजिनदार ईश्वर राठोड यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, गोर बंजारा समाजबांधव, विद्यार्थी, पालक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत सेवालाल महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या आयोजित केला होता.
No comments:
Post a Comment