Tuesday, 7 July 2026

आंबिवली–टिटवाळा मुख्य रस्त्यावर पडले भलेमोठे भगदाड !!

आंबिवली–टिटवाळा मुख्य रस्त्यावर पडले भलेमोठे भगदाड !!

** ठेकेदार व अभियंत्यांवर कारवाईची मागणी

कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील आंबिवली ते टिटवाळा जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर तब्बल सहा फूट खोल व मोठे भगदाड पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.

घटनेची माहिती मिळताच पालिका प्रशासनाने तातडीने दखल घेत खड्डा भरून रस्ता तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीसाठी खुला केला. मात्र, हा केवळ तात्पुरता उपाय असून रस्त्याच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

नगरसेविका तेजश्री गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून या घटनेसाठी निकृष्ट दर्जाचे काम आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य नियोजन नसल्याने रस्त्यात भले मोठे भगदाड पडले याला ठेकेदार आणि पालिका अधिकारी जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच पावसाचे पाणी दीर्घकाळ रस्त्यावर साचल्यामुळे रस्त्याचा काही भाग वाहून गेला तर पाणी साठल्याने भले मोठे रस्त्यावर भगदाड पडले. या रस्त्याच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून पालिका अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगणमत करून मोठा आर्थिक लाभ घेतला आहे असा आरोप नागरिकांनी केला

या रस्त्याच्या बांधकामासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने तब्बल ९ कोटी ४१ लाख रुपये खर्च केले आहेत मात्र, एवढ्या मोठ्या निधीनंतरही रस्ता अल्पावधीतच खचल्याने कामाच्या गुणवत्तेवर संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

दरम्यान, या प्रकरणी संबंधित ठेकेदार आणि कामावर देखरेख करणाऱ्या अभियंत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

नगरसेविका तेजश्री गायकवाड यांनीही या घटनेची गंभीर दखल घेत, सहा फूट खोल भगदाड पडणे ही अत्यंत निष्काळजीपणाची बाब असल्याचे सांगितले. "९ कोटी ४१ लाख रुपयांचा रस्ता काही काळातच खड्ड्यात गेला असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करून या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी," अशी मागणी त्यांनी केली.

या घटनेमुळे शहरातील रस्त्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रस्ते बांधकामांची स्वतंत्र तांत्रिक तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

No comments:

Post a Comment

"स्मार्ट सिटीचे स्वप्न की पाण्याचे संकट? उरणच्या पूरस्थितीवर अलंकार कडू यांचा प्रशासनाला थेट सवाल!" !!

"स्मार्ट सिटीचे स्वप्न की पाण्याचे संकट? उरणच्या पूरस्थितीवर अलंकार कडू यांचा प्रशासनाला थेट सवाल!" !! ** उरणचा विनाशकारी पाऊसः ३५...