आई एकवीरा मातेच्या जयघोषात ९ ऑगस्ट रोजी ‘भव्य बाईक रॅली’ !!
*# कोप्रोली ते श्री क्षेत्र कार्ला एकवीरा गडावर भक्तिमय प्रवास.
उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) : आई एकवीरा मातेच्या भक्तीभावाने प्रेरित होऊन आई एकवीरा मंदिर, कोप्रोली,उरण ते श्री क्षेत्र कार्ला (एकवीरा) गड अशी भव्य बाईक रॅलीचे आयोजन रविवार, दि. ०९ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले आहे.उरण मध्ये पहाटे ६.३० वाजता आई एकवीरा मंदिरात आरती झाल्यानंतर उरण मधून रॅलीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन ढोल-ताशांच्या गजरात रॅली मार्गस्थ होईल. श्री क्षेत्र कार्ला येथील आई एकवीरा मातेचे दर्शन घेतल्यानंतर आई एकवीरा मंदिर परिसराची स्वच्छता, वृक्षारोपण आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून, भक्तीबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात येणार आहे.
या भव्य बाईक रॅलीच्या आयोजनात विविध गावातील भाविक भक्तांचा सहभाग आहे.रॅलीच्या आयोजनासाठी संपूर्ण नियोजन व मार्गदर्शन संस्थापक देविचंद अनंत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.
आई एकवीरा मातेच्या जयघोषाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित या भव्य बाईक रॅलीत शिवप्रेमी, एकवीरा भक्त आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
नाव नोंदणी व संपर्कासाठी फोन नंबर :-
विकी कोळी (कोप्रोली) – ९८२०६७३४८४,
जितू कोळी (कोप्रोली) – ९९३०३०५२५५,
चेतन गावंड (पिरकोन) – ९८१९६७९९०५,
विधाता पाटील (कोप्रोली) – ९९२०६३२०२१,
कुणाल म्हात्रे (कोप्रोली) – ७७७७००१०८७,
प्रसाद पाटील (गोठ्या) – ७९६६६०४०३२,
विनायक गावडे (पिरकोन) – ८०७९२९५४७६,
दूशंत ठाकूर (पानदिवे) – ८८२८६८६६९७,
अक्षय मोकाशी (पानदिवे) – ८०८२२५८८२९,
संस्थापक देविचंद अनंत म्हात्रे – ९८२१८३८४०८
No comments:
Post a Comment