Sunday, 12 July 2026

डोंबिवलीतील अतीधोकादायक, धोकादायक रासायनिक उद्योग स्थलांतरित करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर ! श्री आदित्य ठाकरेंच्या प्रश्नावर उद्योग मंत्र्यांचे विधिमंडळात उत्तर !!

डोंबिवलीतील अतीधोकादायक, धोकादायक रासायनिक उद्योग स्थलांतरित करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर ! श्री आदित्य ठाकरेंच्या प्रश्नावर उद्योग मंत्र्यांचे विधिमंडळात उत्तर !!

             डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील अतिधोकादायक, धोकादायक रासायनिक उद्योग स्थलांतराचा प्रश्न गेले काही वर्षांपासून चर्चेला जात आहे. यापूर्वी डोंबिवली एमआयडीसी मधील अनेक रासायनिक कंपन्यांचे मोठे स्फोट होऊन मालमत्ता आणि मनुष्य हानी मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यावेळी नेहमीच अतिधोकादायक, धोकादायक उद्योगांचे स्थलांतर करण्याविषयी चर्चा होत असे. परंतु त्यावर ठोस असा निर्णय होताना दिसत नव्हता. नुकत्याच पावसाळी अधिवेशनात हा विषय शिवसेना नेते, माजी पर्यावरण मंत्री आणि आमदार श्री आदित्य ठाकरे यानी उपस्थित करून उद्योग मंत्री श्री उदय सामंत यांच्याकडून सकारात्मक उत्तर मिळविले आहे. त्यामुळे डोंबिवलीतील अतीधोकादायक, धोकादायक रासायनिक उद्योग स्थलांतरित होण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर असल्याचे दिसत आहे. 

            रासायनिक उद्योग ऐवजी ग्रोथ सेंटर, आयटी क्षेत्र, माहिती आणि तंत्रज्ञान यासारख्या रोजगार निर्मिती करणाऱ्या कंपन्या सुरू करण्याबाबत शासन स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. काही रासायनिक उत्पादकांनी रासायनिक उत्पादनाऐवजी माहिती व तंत्रज्ञान याकरिता एमआयडीसी कडून परवानगी घेऊन आपले रासायनिक उद्योग बंद केले आहेत. असे सविस्तर उत्तर माननीय उद्योगमंत्री श्री उदय सामंत यानी शिवसेना नेते आणि आमदार श्री आदित्य ठाकरे यानी विचारलेल्या प्रश्नावर दिले आहे. खरेतर हा निर्णय यापूर्वी श्री उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतला होता. त्यांनी त्यावेळी एका प्रदूषण प्रश्नावर डोंबिवलीत प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. पण त्यानंतर आलेल्या करोना महामारीने हा प्रश्न प्रलंबीत राहिला होता. यामुळे आता भविष्यात डोंबिवलीतील कंपन्यांत स्फोट आणि प्रदूषण होणार नाहीत अशी आशा ठेवूया.
              डोंबिवली एमआयडीसी मधील अमुदान आणि प्रोबेस कंपनी स्फोटातील मालमत्ता नुकसान पिडीतांना नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही आहे. तसेच स्फोटातील मृतांना मिळालेली नुकसान भरपाई पुरेशी मिळाली नसल्याने ती अधिक मिळावी यासाठी शिवसेना नेते आणि आमदार श्री आदित्य ठाकरे प्रयत्नशील असून पुढील अधिवेशनात हा प्रश्न मांडण्यात येणार आहे.
           काही दिवसांपूर्वी केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना झालेल्या मारहाण प्रकरणी श्री आदित्य ठाकरे यांनी विधिमंडळात प्रश्न विचारून यावर कारवाई करण्यास सरकारला भाग पाडले होते. शिवाय त्यानी प्रत्यक्ष डोंबिवलीत शास्त्रीनगर रुग्णालयात येऊन डॉक्टरांशी चर्चा करून त्यांना पाठिंबा दिला होता. आता डोंबिवलीतील अतीधोकादायक, धोकादायक रासायनिक उद्योगांचा प्रश्न काही अंशी त्यानी सोडविल्याने श्री आदित्य ठाकरेंचे आजोळ असलेल्या डोंबिवलीकडे त्यांचे खास लक्ष असल्याचे दिसत आहे.
          वरील संदर्भात सर्व माहितीचे निवेदन हे शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) श्री अभिजीत सावंत, माजी विभागप्रमुख, ज्येष्ठ शिवसैनिक राजू नलावडे आणि सुरक्षा माईग्रेट डेस्क या स्वयंसेवी संस्थेच्या (एनजीओ) समन्वयक भक्ती वर्दम या सर्वांनी सेनाभवन येथे प्रत्यक्ष भेटून शिवसेना नेते, माजी पर्यावरण मंत्री आणि आमदार श्री आदित्य ठाकरे याना दिले होते.

No comments:

Post a Comment

खडवली येथे धावत्या एसटी बसला भीषण आग; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे ३० ते ३५ प्रवाशांचे प्राण वाचले !!

खडवली येथे धावत्या एसटी बसला भीषण आग; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे ३० ते ३५ प्रवाशांचे प्राण वाचले !! ** भिवंडी आगाराच्या खडवली–पडघा फेरीतील ...