खोपटा कोप्रोली चिरनेर रस्त्यांच्या समस्या घेऊन शिवसेनेची PWD ला धडक !!
उरण दि २१, (विठ्ठल ममताबादे) ता. २०.०७.२०२६ रोजी सकाळी सार्वजनिक बांधकाम विभाग उरण येथील कार्यालयात कार्यकारी उपअभियंता डी एम पाटील यांची उरण पंचायत समिती सदस्य कविता रूपेश पाटील, माजी सभापती विश्वास म्हात्रे, चिरनेर ग्रा पं. सरपंच भास्कर मोकल, शिवसेना तालुका उपसंघटक रूपेश पाटील, रोहिदास पाटील, युवानेता एड. पर्जन्य म्हात्रे, कलंबुसरे ग्रा. पं उपसरपंच गजानन गायकवाड, भार्गव पाटील आदीं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. तत्पूर्वी चर्चा करताना गोरख ठाकूर, रूपेश भगत, राजू म्हात्रे, नंदू पाटील आदी खोपटे ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी विविध समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आले.खोपटा कोप्रोली चिरनेर रस्त्यावरील खड्डे त्वरित भरणे , जुना खोपटा पुलाची दुरुस्ती कामाला गती देऊन वाहतुकीस खुला करणे, या रस्त्याला आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसवणे अशा मागण्या करण्यात आल्या.
याशिवाय खोपटा कोप्रोली कलंबुसरे चिरनेर येथील पाण्याचा नीट निचरा न होणाऱ्या मोऱ्यांची दुरुस्ती करणे, काही ठिकाणी नवीन छोटे पूल (बॉक्स कलवर्ट ) उभारणे आदिची मागणी केली. याबाबत नव नियुक्त उप कार्यकारी अभियंता डी एम पाटील यांनी तातडीने कार्यवाही करण्याबाबत विभागाला सूचना केल्या. मोऱ्यांच्या कामासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून कार्यवाही करण्याचे अभिवचन डी एम पाटील यांनी दिले आहे
No comments:
Post a Comment