Tuesday, 4 August 2026

*बहुजन विकास आघाडीचा वतीने प्रभागातील होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप....*

*बहुजन विकास आघाडीचा वतीने प्रभागातील होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप....*

नालासोपारा ता, ४ :- लोकनेते हितेंद्रजी ठाकूर, युवा मा.आमदार क्षितिज दादा ठाकूर, महापौर अजीवजी पाटील, उपमहापौर मार्शलजी लोपीस, जेष्ठ नेते हेमंतजी म्हात्रे (बंधु ) यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेविका रूचिता नाईक आयोजित बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी यांच्या हस्ते नालासोपारातील प्रभाग क्रमांक ११ मधील समेळपाडा येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या उज्ज्वल भविष्यास हातभार लागावा आणि शिक्षणाचा प्रवास अधिक सक्षम व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे आयोजक समाजसेविका रूचिता नाईक यांनी राबविलेल्या सामाजिक उपक्रमाचे पालकांनी कौतुक करत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा  उपक्रमांना सदैव पाठबळ राहील.

शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा देणाऱ्या या उपक्रमाला लाभलेला विद्यार्थी आणि पालकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. या उपक्रमास बहुजन विकास आघाडीचा सविताताई कांबळे, रोहितजी डिसूझा, रोहनजी डिसूझा, राजेंद्रजी खुळे, फय्याज शेख, शुभांगी धरसे, निलीमा पारसकर, शाहीदाजी, जया गुप्ता, भाविका छावडा, अमित नाईक व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

समेळपाडा मध्ये नागरी समस्यांत वाढ; नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे परिणाम....

समेळपाडा मध्ये नागरी समस्यांत वाढ; नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे परिणाम.... *प्रभाग क्र ११ मधिल समस्यांबाबत समाजसेविका रूचिता नाईक यांचे महापौ...