समेळपाडा मध्ये नागरी समस्यांत वाढ; नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे परिणाम....
*प्रभाग क्र ११ मधिल समस्यांबाबत समाजसेविका रूचिता नाईक यांचे महापौरांना निवेदन..*
नालासोपारा ता, ७ :- प्रभाग क्रमांक ११ मधील समेळ पाडा परिसरातील समस्या कायम असल्याने समाजसेविका रूचिता नाईक यांनी 'नगरसेवक नेमके काय काम करतात' असा प्रश्न उपस्थित केला आहे.
समे़ळपाडा मधिल चैतन्य स्कुल मागील नैसर्गिक नाला बुजवून त्याठिकाणी आर सी सी पाईप टाकण्यात आले परंतु नाल्यावरती लोखंडी जाळी नसल्याने सर्व कचरा आत पडत असल्याने वारंवार नाला तुंबला जातो यामुळे पावसाचे पाणी नाल्याचे पाणी वाहत नसल्याने रोगराई व पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होते.
गणेश कृपा सोसायटी जवळील उद्यानात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.त्यामुळे आरोग्याच प्रश्न निर्माण झाला आहे.या ठिकाणी उद्यान विकसित करण्याची मागणी करण्यात आली आहे,पथदीप नादुरुस्त अवस्थेत आहेत.
तेथील समस्यांकडे लक्ष दिले जात नाही नगरसेवक कोणीही फिरकून पहात नाहीत.नगरसेवक नेमकी कोणती कामे करतात.असा प्रश्न समाजसेविका रूचिता नाईक यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात महापौर अजीव पाटील साहेब यांना निवेदन देऊन प्रभाग क्रमांक ११ मधिल समेळपाडा परिसरातील समस्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्यात अशी मागणी समाजसेविका रूचिता नाईक यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment