आषाढी वारी निमित्ताने श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान ची २०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन शैक्षणिक वारी उत्साहात साजरी !!
श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान ठाणे यांच्या तर्फे पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुका येथील अतिदुर्गम भाग ज्या ठिकाणी साधी बस देखील व्यवस्थित जात नाही अशा ठिकाणी जाऊन गेली ६ वर्ष संस्थेच्या माध्यमातून मुलांना शैक्षणिक वारी या उपक्रमांतर्ग शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
वडपाडा, पिंपळपाडा, बोंडारपाडा आणि वांगणपाडा या गावातील जिल्हा परिषद शाळांमधील एकूण २०० विद्यार्थ्यांना यंदा शैक्षणिक साहित्य वाटण्यात आले. त्यात दर्जेदार दफ्तर, पेन्सिल, पट्टी, वही, पेन, चित्रकला वही, कलर, पाण्याची बॉटल, तसेच त्या ठिकाणी न मिळणारे साहित्य व शैक्षणिक कामासाठी स्टेशनअरी देखील शाळाना देण्यात आले. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, डोळ्यांतील चमक आणि निरागस हास्य पाहून मन अक्षरशः भरून आलं. अशा स्वप्न घेऊन फिरणारी मुल उद्या भरारी घेताना दिसतील हे मात्र नक्की.
आषाढी वारी अनेक जन करतात पण संस्था दरवर्षी न चुकता आषाढी शैक्षणिक वारी करते. उज्वल भविष्या साठी. हितचिंतक देणगीदार यांनी केलेली मदत संस्थेच्या माध्यमातून प्रतिकूल परिस्थितीत आपली जिद्द करणाऱ्या मुलांन पर्यंत पोहचली हीच खरी पोच पावती आहे.
संत तुकाराम महाराजांच्या अभंग साधू - संत येती घरा । तोचि दिवाळी दसरा ।। असच काहीस आदिवासी पडद्यावरील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना साहित्य देताना घडले. तसेच मुलांन बरोबर गप्पा, चर्चा, आदिवासी नृत्य, लेझीम सादर करून उत्साहात शैक्षणिक वारी यशस्वी झाली.
संस्थेच्या मदतीस संस्थेचे अध्यक्ष रुपेश शिंदे सचिव अजय भोसले, उपाध्यक्ष पूनम सावंत, सदस्य शुभम कांबळे, निशांत कोळी, आरती गाढवे, पल्लवी लंके, अमोल पाटील, राजेंद्र गोसावी, भाग्यश्री गिरी, पद्मा मैथिस, महेंद्र कांबळे यांनी मोलाची मदत करून कार्यक्रम यशस्वी केला.
आपला
अजय आनंदी महादेव भोसले
सचिव
८१०८९४९१०२
No comments:
Post a Comment