*बातमीचा इम्पॅक्ट : *झाडे कोसळण्याच्या घटनांनंतर केडीएमसीकडून तज्ज्ञ समिती स्थापन !!
*कल्याण-डोंबिवली, दि. ५ ऑगस्ट 2026*
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात पावसाळ्यात झाडे कोसळण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीच्या उद्यान विभागाने तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे.
*एमआयडीसीत 15 झाडे कोसळली*
डोंबिवली एमआयडीसी परिसरात या पावसाळ्यात आतापर्यंत अंदाजे 15 झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये वाहने आणि इमारतींच्या संरक्षक भिंतींचे नुकसान झाले आहे. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनांच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर केडीएमसीने या विषयाची गंभीर दखल घेतली.
*तज्ज्ञ समिती गठित*
मुख्य उद्यान अधीक्षक श्री. संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पाच सदस्यांची तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे.
*समिती सदस्य*: डॉ. श्रेया भानप, उमेश मुंडल्ये, रुपाली शाईवाले, अविनाश पाटील, महेश देशपांडे
या समितीने कोसळलेल्या काही झाडांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे.
*पुढील कार्यवाही काय?*
ही झाडे कोणत्या कारणांमुळे कोसळली आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणते उपाय करता येतील याचा सविस्तर अहवाल ही समिती केडीएमसी आयुक्तांना सादर करणार आहे. त्यानंतर आयुक्तांसोबत चर्चा करून पुढील उपाययोजना आणि अंमलबजावणी केडीएमसीकडून केली जाणार आहे.
या निर्णयामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. याबद्दल केडीएमसी उद्यान विभाग आणि बातमीदार माझा यांना समाजसेवक मा. राजू नलावडे, डोंबिवली यांनी धन्यवाद दिले आहेत.
No comments:
Post a Comment