Monday, 3 August 2026

भिवंडी महापालिकेत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी !!

भिवंडी महापालिकेत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी !!

महापौर नारायण चौधरी यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण; अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून अभिवादन

प्रतिनिधी भिवंडी 
दिनांक 3 ऑगस्ट 2026

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयात महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या २९ डिसेंबर २०२५ च्या परिपत्रकानुसार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शनिवारी (१ ऑगस्ट) उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी महापौर नारायण रतन चौधरी यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

महानगरपालिका मुख्यालयाच्या तळमजल्यावर आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या साहित्याने वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाला संघर्षाची प्रेरणा दिली असून सामाजिक समतेचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

यावेळी उपायुक्त (मुख्या) विक्रम दराडे, उपायुक्त (शिक्षण) बाळकृष्ण क्षिरसागर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप गाडेकर, सहायक आयुक्त (शिक्षण) नितीन पाटील, मुख्य उद्यान अधीक्षक निलेश संख्ये, सहायक आयुक्त (आरोग्य) फैसल तातली, सहायक आयुक्त प्रभाग समिती क्र. १ समीर जवरे, प्रभाग समिती क्र. २ विनोद मनोरे, प्रभाग समिती क्र. ३ नितेश चौधरी, प्रभाग समिती क्र. ४ अरविंद घुगरे, प्रभाग समिती क्र. ५ गिरीष घोष्टेकर, अग्निशमन अधिकारी नितीन चव्हाण, सुरक्षा विभाग प्रमुख सुदाम जाधव, वाहन विभाग प्रमुख शेखर चौधरी, क्रीडा विभाग प्रमुख निहाला पटेल, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत सोनावणे, हरिष भंडारी तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले. सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि मानवतेच्या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

संपूर्ण कार्यक्रम श्रद्धापूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

No comments:

Post a Comment

भिवंडी महापालिकेत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी !!

भिवंडी महापालिकेत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी !! महापौर नारायण चौधरी यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण; अधिकारी...