उल्हासनगर मध्ये वालधुनी नदीच्या पुराने नागरिकांचे नुकसान, रेल्वेने केलेल्या मातीच्या भराव मुळे नदीचे पाणी घरात !!
उल्हासनगर , दि . ३ प्रतिनिधी : उल्हासनगर शहरात धुव्वाधार पावसाने वालधुनी नदीला आलेल्या पुराने सम्राट अशोक नगर , रेणुका सोसायटी , वडोल गांव येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरुन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन हे पाणी रेल्वेने नवीन ट्रॅक टाकन्यासाठी वालधुनी नदी पात्रात मातीचा भराव केल्यामुळेच सदर नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. याला रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. या पुरग्रस्ताना शासन व रेल्वे प्रशासन यांनी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी समाजसेवक शिवाजी रगडे व माजी नगरसेवक गजानन शेळके यांनी केली आहे.
उल्हासनगर शहरात जोरदार पाऊस सुरु असुन मध्यरात्री आलेल्या वालधुनी नदीला अचानक पुर आला असुन या पुराचे पाणी वालधुनी नदीच्या काठावर असलेल्या वस्त्या मध्ये शिरुन नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसाने झाले आहे.मध्यरात्रीच्या नंतर आलेल्या पुरामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले असुन नागरिक झोपेत असताना हा पुर आला तेव्हा नागरिकानी घरातील जीवनोपयोगी वस्तु सोडुन तसाच पळ काढला. दरम्यान या पुरामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वालधुनी नदीला आलेल्या पुराचे पाणी सम्राट अशोनगर , रेणुका सोसायटी , वडोलगाव या वस्त्यामध्ये शिरुन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर पाण्याचा प्रभाव इतका जोरदार असल्याने नागरिकानी आपले सामान न घेता बाहेर पडले आहेत. दरम्यान रेल्वे प्रशासनाने वालधुनी नदीच्या पात्रात नवीन ट्रॅक टाकन्यासाठी मातीचा भराव केला असल्यामुळे या परिसरात पुराचे पाणी शिरले आहे. तेव्हा शासनाने व रेल्वे प्रशासनाने या पुरग्रस्ताना आर्थिक मदत देण्याची मागणी आरोग्य समितीच्या सभापती सविता तोरणे रगडे , सनाजसेवक शिवाजी रगडे व माजी नगरसेवक गजानन शेळके यांनी दोन्ही शासनाकडे केली आहे.
No comments:
Post a Comment