Sunday, 2 April 2023

संतोष अगबुल प्रतिष्ठाण आयोजित रक्तदान शिबीरला उत्स्फूर्त प्रतिसाद !

संतोष अगबुल प्रतिष्ठाण आयोजित रक्तदान शिबीरला उत्स्फूर्त प्रतिसाद !

*१०२० पुरुष - महिला रक्तदात्यांनी केले रक्तदान* 

नालासोपारा (दिपक मांडवकर/शांताराम गुडेकर) :
                 नालासोपारा येथे दिवाईन स्कुल येथे  संतोष अगबुल प्रतिष्ठाणच्या वतीने भव्य  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकीची जपवणूक करून १०२० (पुरुष -महिला -युवक -युवती) रक्तदात्यांनी विक्रमी रक्तदान केले. यावेळी रक्तदान शिबिरात महीलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. संतोष अबगुल प्रतिष्ठांच्यावतीने प्रत्येक रक्तदात्यांना प्रमाणपत्र, फ्रुटी बिस्किट व जेवणाची व्यवस्था केलेली होती. या शिबिराला अरूण जाधव नगरसेवक, निलेश देशमुख नगरसेवक, विश्वनाथ रक्ते, यांच्या उपस्थितीत व प्रतिष्ठाणच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने हे यशस्वी रक्तदान शिबीर संपन्न झाले. यनिमित्ताने प्रतिष्ठानचे संस्थापक श्री.संतोष दादा अबगुल यांनी आम्ही जात धर्म प्रांत भेदभाव कधीच करत नसून निस्वार्थीपणे समाजसेवा करत आहोत. हा वास यापुढेही असाच चालू रहाणार असून या कार्याचे श्रेय माझ्या सर्व पदाधिकारी, सभासद, सदस्याना अर्पण करतो असे मत व्यक्त केले.प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे विभागात कौतुक होत असून अनेकांनी त्यांना यनिमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.

भिवंडीतील कोपर गावात "श्री.राम कथा" सप्ताहाचे आयोजन !

भिवंडीतील कोपर गावात "श्री.राम कथा" सप्ताहाचे आयोजन !

भिवंडी, दिं,३, अरुण पाटील (कोपर)
          भिवंडी तालुक्यातील कोपर गावात "श्री राम कथा" सप्ताहाचे आयोजन चैत्र शुक्ल१३,सोम प्रदोष अनंत त्रयोदशी वार सोमवार, दिं,२/४/२०२३ ते चैत्र कृष्ण १ वार १, वार, शुक्रवार दिं,०७/४/२०२३ पर्यंत आयोजित केले आहे. तरी गावात पहिल्यांदा होणाऱ्या या सोहळ्याचा लाभ घेण्याची विनंती आयोजक तथा गावचे सरपंच श्री.हेमंत घरत यांनी केले आहे.
           या परिसरातील वै.हभप काशिनाथ बाबा, वै,हभप महंत महानंद बाबा, चिद्धन स्वामी, माधव स्वामी पूर्णेकर महाराज, चिदानंद स्वामी चिंतामण स्वामी (दिंडी गड), हभप मधुकर पाटील महाराज, महंत भालचंद्र महाराज तरे, हभप कबिर महाराज म्हात्रे, हभप बंडू महाराज ,हभप फुलचंद महाराज पाटील, यांच्या शुभ आशिर्वादाने कोपर येथे होणार आहे.
           या सोहळ्यासाठी लातूर जिल्ह्यातील रामानाचार्य ह.भ. प.शंकर महाराज देशमुख (लातूरकर) व श्री. ह.भ. प.पांडुरंग म. गव्हाणे.(आळंदीकर) हे आपली सेवा देणार आहेत. या वेळी रोज सकाळी पहाटे ५ ते ७ दरम्यान काकडा (काकड आरती) होणार आहे. या सोहळ्यात गावातील हभप गोरखनाथ बुवा पाटील, हभप जगन्नाथ बुवा पाटील, हभप सूर्यकांत बुवा घरत, हभप दत्तात्रेय बुवा घरत, हभप सोपं बुवा पाटील, हभप भगवान बुवा भंडारी, हभप अविनाश बुवा म्हात्रे, हभप विठ्ठल बुवा पाटील, देवराम बुवा पाटील हे भक्तिभावाने आपली सेवा देणार आहेत.
              पहिल्या दिवशी वार सोमवार, दिं,३/४/२०२४ ते शुक्रवार दिं,७/४/२०२३ पर्यंत रोज रात्री ७ ते ९•३० वा. श्री राम कथा रामानाचार्य हभप शंकर महाराज देशमुख (लातूरकर) यांचा कार्यक्रम होणार आहे.तर हरी कीर्तन (कल्याचे कीर्तन)हभप पांडुरंग महाराज गव्हाणे(आळंदीकर),देवाची आळंदी,यांचे होणार आहे.
             या आनंदी सोहळ्यात सोमवार दिं,३/४/२०२३ ते बुधवार दिं, ६/३/२०२३ रोजी रोज सकाळी ६ ते ११ या कालावधीत कोपर गावातील बाळगोपाल भजणी मंडळ व कोपरेश्र्वर भजनी मंडळ भजन व हरिपाठरुपी आपली सेवा देणार आहेत.या कार्यक्रमा दरम्यान सरपंच श्री.हेमंत सूर्यकांत घरत, हभप गोरखनाथ नागो पाटील, वै. सौ.मोहिनी रंजन पाटील यांच्या स्मरणार्थ श्री.रंजन बाबू पाटील ,श्री.गणेश प्रसाद वाराई संघटना_कोपर,तर काल्याचा महाप्रसाद हभप वै.सखुबाई चंद्र्या घरत व हभप वै. सौ.यशोदा सूर्यकांत घरत यांच्या स्मरणार्थ मे.रोशनी इंटर प्राईजेस अँड कं चे मालक तथा सरपंच श्री.हेमंत सूर्यकांत घरत या सर्वांनी अन्नदाते व फराळदाते म्हणून आपला सेवाभाव रूपाने खारीचा वाटा उचलला आहे. 
        या पार पडणाऱ्या शुभप्रसंगी मा. खासदार तथा केंद्रीय पंचायत राज "राज्य मंत्री"मा.श्री.कपिल पाटील , व भारतीय युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मा.श्री.देवेशजी पुरषोत्तम पाटील यांनी शुभ आशिर्वाद दील्याचे निमंत्रण पत्रिकेत म्हटले आहे.

केरवडे व वाळकुळी ता.चंदगड येथील जलजीवन मिशन योजनेचा आणि पंतप्रधान सडक योजनेतून रस्त्याच्या कामाचा शुभारंभ !

केरवडे व वाळकुळी ता.चंदगड येथील जलजीवन मिशन योजनेचा आणि पंतप्रधान सडक योजनेतून रस्त्याच्या कामाचा शुभारंभ !

चंदगड (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर) :
             केरवडे ता.चंदगड (९३ लाख रुपये) व वाळकुळी ता. चंदगड (१ कोटी २५ लाख रुपये) येथील जलजीवन मिशन योजनेचा शुभारंभ आणि पंतप्रधान सडक योजनेतून ४ कोटी ९९ लाख रुपयांच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. 

         यावेळी जेष्ठ नेते मा.श्री. भरमुआण्णा पाटील (माजी राज्यमंत्री), मा.श्री. संग्रामदादा कुपेकर, मा.श्री.सचिन बल्लाळ (जिल्हा परिषद सदस्य ), मा. श्री. शांताराम पाटील (माजी सभापती), मा.श्री.बबनराव देसाई (माजी सभापती), मा.श्री.नामदेवराव पाटील (भाजपा तालुका अध्यक्ष), मा.श्री. दीपक पाटील (गोकुळ संचालक), 

         मा.श्री.रविंद्र बांदिवडेकर (सरचिटणीस भाजपा), मा.श्री. लक्ष्मण गावडे (उद्योजक), मा.श्री.परेश पाटील (कॉन्ट्रॅक्टर), ॲड.श्री.विजय कडुकर, मा.श्री.अनिल शिवणगेकर (सर), मा.श्री.लहु आदकारी, मा.सौ.समृद्धी काणेकर, मा.श्री. अंकुश गवस, मा.श्री. चंद्रशेखर गावडे, मा. श्री.रामभाऊ पारसे, ॲड. श्री.संतोष मळवीकर, मा.श्री.गणेश फाटक, मा.सौ.वृषाली करंबळकर (सरपंच), मा.श्री.रविंद्र सुतार (उपसरपंच), मा.श्री.अनिल होडगे, मा.श्री. संतोष बारवेलकर, मा.श्री.मधुकर साळोखे, मा.सौ. यल्लुबाई यादव व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुर्लोद येथे १५१ कुटुंबांना वाटर व्हील चे वाटप !

कुर्लोद येथे १५१ कुटुंबांना वाटर व्हील चे वाटप !

जव्हार, जितेंद्र मोरघा :

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली व माऊली ग्रुप डोंबिवली  तसेच एकलव्य आधार प्रतिष्ठाण मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कुर्लोद ग्रामपंचायत मध्ये शेडयाचापाडा, जाभुळवाडी,आंबेवाडी, रायपाडा, मानीचापाडा, शेरीचापाडा, व वडपाडा,या पाडयांतील तब्बल १५१ कुटुंबाना water on wheel ( पाण्याचे लोटगाडे ) मोफत वाटण्यात आले. या मागील एकच उद्देश आहे की, ज्या खेडो-पाड्यातील आपल्या महिला भगिनी आहेत. त्याचा वेळ वाचावा व डोक्यावरील दुडीचे ओझे कमी व्हावं या साठी हा उपक्रम राबविला जातो.या उपक्रमासाठी  भा.ज.पा. आदिवासी आघाडी पालघर जिल्हयाचे  जिल्हाध्यक्ष  मिलिंदजी भाऊ झोले तसेच त्यांच्या मातोश्री जिल्हा परिषद सदस्यां पालघर जिल्हा सौ. कुसुमताई झोले यांच्या अतोनात प्रयत्नाने व त्यांच्या विनंतीस मान देऊन रोटरी क्लब ऑफ डोंबिवली व माऊली ग्रुप डोंबिवली  तसेच एकलव्य आधार प्रतिष्ठाण. या तिघांचा जोड होऊन हा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे कुर्लोद ग्रामपंचायत मध्ये गाव-पाड्यामध्ये पार पडला.
         यावेळी भाजपाचे कार्यकर्ते  गंगाराम फसाळे, नरेश झोले अंकुश पाडेकर तसेच कुर्लोद ग्रामपंचायतचे सदस्य रघुनाथ बुधर, मनोज बुधर, भाऊ बुधर, मधुकर मोडक इत्यादी गावकरी तसेच मानीचापाडा या गावच्या आशा कार्यकर्ता  रंजना फुफाणे आणि ज्यांच्या सहकार्याने आम्ही प्रत्येक गाव - पाड्यातील कुटुंबाची माहिती गोळा करतो असे या भागातील समाज सेवक  हनुमंत वाघ दादा  इत्यादी मान्यवर उपस्थीत होते.

Saturday, 1 April 2023

मानसिकता लक्षात आल्यास, आत्महत्या टळू शकतात - डॉक्टर अंबरीश धर्माधिकारी (मानसोपचार तज्ञ)

मानसिकता लक्षात आल्यास, आत्महत्या टळू शकतात - डॉक्टर अंबरीश धर्माधिकारी (मानसोपचार तज्ञ)

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
                   राॅयल सेलिब्रेशन हाॅल येथे नुकतेच भांडुप पोलीस ठाणे, सक्षम समुपदेशन केंद्र-विक्रोळी (पूर्व प्रादेशिक विभाग), मिरॅकल फाउंडेशन (मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती उपचार केंद्र) आणि देवामृत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने "जीवन जगण्यासाठीचा जागर" हा विशेष जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

               या कार्यक्रमात भांडुप पोलीस ठाणे विभागात होणाऱ्या आत्महत्या या विषयावर डॉक्टर अंबरीश धर्माधिकारी (मानसोपचार तज्ञ) यांनी सांगितले की, आत्महत्या पूर्वी त्या व्यक्तीस नैराश्य आलेले असते. अशावेळी त्यांची मानसिकता लक्षात घेऊन, त्यांना बोलतं करणे. ते सांगत असलेल्या माहितीकडे लक्ष देणे. त्यावर कोणतेही प्रश्न न विचारता अथवा त्याकडे दुर्लक्ष न करणे. तसेच योग्य वेळी त्यांना मानसोपचार तज्ञ यांच्याकडे समुपदेशन व उपचार साठी घेऊन जाणे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीची ती वेळ जर टळली तर, निश्चितच ते आत्महत्या पासून परावृत्त होतील.
               मिरॅकल फाउंडेशन (मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती उपचार केंद्र) चे समन्वयक रमेश सांगळे म्हणाले की, व्यसनाधीन झाल्यानंतर शेवटची पायरी आत्महत्येची असते. आपण पालक म्हणून आपल्या पाल्यांकडे योग्य वेळी लक्ष देणं गरजेचं असते. मुलांचे मित्र, त्यांच्या येण्याजाण्याच्या वेळा, याबाबत मित्रांप्रमाणे त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. तसेच मुलगा काहीतरी व्यसन करीत आहे. हे लक्षात आल्यानंतर त्यास पाठीशी न घालता, मारहाण अथवा बडबड करण्यापेक्षा मानसोपचार तज्ञांकडे घेऊन जाऊन समुपदेशन व उपचार घेणे गरजेचे आहे. जर आपण त्याला पहिली वेळ आहे. पुढे असे करू नको अशी समज दिली. तरीसुद्धा मुलं व्यसनांकडे वळतातच आणि मग ती व्यसनाधीन झाल्याच्या त्यांना व्यसनातून बाहेर काढणं कठीण जाते. मुलं अथवा घरातील कोणतीही व्यक्ती व्यसन करून आजारी होतात तर त्यांचे कुटुंब व्यसन न करता आजारी होते. यासाठी पालकांनीही स्वतः निर्व्यसनी रहाणं गरजेचे आहे.वरील विषयास अनुसरून उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मार्गदर्शन करणाऱ्या वक्त्यांनी दिली.
                कार्यक्रमास श्रीमती. सुरेखा कपिले (स.पो. आयुक्त - भांडुप विभाग), सक्षम समुपदेशन केंद्राचे अक्षय कुलकर्णी (क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ), देवामृत फाउंडेशनच्या संचालिका श्रीमती. प्रिया जाधव, स्वप्निल तावडे, यांच्यासह भांडुप विभागातील तुळशेतपाडा, टेंबीपाडा येथील महिला, पुरुष व तरुण वर्ग जास्त संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नितीन उन्हवणे (व. पो. निरीक्षक, भांडुप पोलीस ठाणे) यांनी केले.

चोपडा आदिवासी भाग.. अंगणवाडीच्या खाऊ शिजवणारे बचत गटांचा आंदोलनाचा एल्गार पेटणार..!!

चोपडा आदिवासी भाग.. अंगणवाडीच्या खाऊ शिजवणारे बचत गटांचा आंदोलनाचा एल्गार पेटणार..!!

चोपडा, प्रतिनिधी.. चोपडा येथे अंगणवाडीच्या खाऊ शिजवणाऱ्या बचत गट महिलांची मीटिंग आयटक चे राज्य उपाध्यक्ष काँ अमृत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली त्यावेळी झालेल्या चर्चेत ते म्हणाले की, अलीकडे महाराष्ट्र शासनाने ई टेंडर लागू करून व आता फेडरेशन कडे खाऊ देणे वर्ग करून ग्रामीण भागातील शेतमजूर महिलांना ज्यांनी बचत गट केलेले आहेत आणि जे सुरळीतपणे खाऊ पुरवतात अशांना  बेरोजगारी लादली जात आहे,  कारण ई टेंडर लागू केल्याने अज्ञानामुळे तांत्रिक बाबी पूर्ण न केल्यामुळे बरेचसे बचत गटांना ई टेंडर मिळू शकले नाहीत, प्रस्थापित व प्रस्थापितांच्या आशीर्वादाने धनिक लोकांनी बळकावून  आहेत मा उद्धव ठाकरे सरकार काळात ई टेंडर प्रक्रिया बंद होती परंतु माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री यांच्या कल्पनेतील ई टेंडर प्रोसिजर पुन्हा सुरू झाली आहे त्यात बहुसंख्य महिला बचतगटांचा रोजगार हिरावला जात आहे फेडरेशन कडे खाऊ देणे म्हणजे खाजगीकरण याची सुरुवात वआहे या खाऊ देण्यास विरोध व .. ई टेंडर नकोच नको अशी भूमिका बचत गट संघटनांची आहे, अंगणवाड्यांना खाऊ पुरवण्याचे काम पूर्वीप्रमाणे.ग्राम पंचायतीनी निवड केलेल्या बचत गट याना असावे शासनाने भारतीय राज्यघटनेच्या 40 वा कलमानुसार पूरक सरकार म्हणून मान्यता असलेल्या पंचायत राज चे अधिकारावर अतिक्रमण करू नये असा इशारा  कॉम्रेड अमृत महाजन यांनी आपल्या भाषणात दिला तसेच या बैठकीत त्यांनी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या आशा व गटप्रवर्तक मोर्चात सहभागी अशा अंगणवाडी सेविका मदतीस यांना धन्यवाद दिले व मोर्चाची  फलश्रुती व अंगणवाडी संपानंतर झालेल्या घडामोडीची सविस्तर माहिती   तसेच गेल्या दोन महिन्यापासून बचत गटांचा महिला त्यांच्या रोजगारासाठी हक्कासाठी लढत आहेत त्याचीही माहिती देऊन येत्या सोमवारी अंगणवाड्यांना मुलाचे मुलांना व महिला लाभार्थींना दर्जेदार सकस आहार मिळावा म्हणून.. खाऊचे दर वाढवा..  ५.५  महिन्यांची थकीत बिले द्या.. अमृत आहाराचे दर ३५ रु आहेत ते परवडत नाहीत ते ७५₹ करा..फेडरेशन कडे खाऊ देऊ नका आदी मागण्यांसाठी येत्या सोमवारी जिल्हाधिकारी याना निवेदन देणार आहोत असे सांगून वेळ पडल्यास हाई कोर्टातही जाणार!!! असा इशारा दिला आहे.
 अंगणवाडी सेविका ना नवीन मोबाईल मिलेतो ऑफलाईन कामे करणार .!!. पोषण ट्रॅकर ॲप मराठीत हवा..!! सेविका सुपरवायझर यांचे सहीची प्रमाणित बिले ग्राह्य धरावित त्यात मनमानी कपात नको  यावरही चर्चा झाली. 

मीटिंगला वैजापूर नागल वाडी, कर्जाना, वराड या ठीकानीचे सेविका मदतनीस व बचत गट उपस्थित होते अशीही माहिती कॉम्रेड महाजन यांनी दिली आहे

मुंबई पुणे एक्सप्रेस वर अनेक ठिकाणी दुरुस्ती ची कामे पण तरीही' टोल, मध्ये भरमसाठ वाढ, शासनासह सर्व मुगगिळून गप्प ?

मुंबई पुणे एक्सप्रेस वर अनेक ठिकाणी दुरुस्ती ची कामे पण तरीही' टोल, मध्ये भरमसाठ वाढ, शासनासह सर्व मुगगिळून गप्प ?

कल्याण, (संजय कांबळे) : मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांना जोडणा-या एक्सप्रेस वेवर अनेक ठिकाणी दुरुस्ती ची कामे सुरू असताना दुसरीकडे या द्रुतगती महामार्गावरुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांच्या कडून घेतल्या जाणाऱ्या 'टोल, मध्ये मात्र भरमसाठ वाढ करण्यात आली असताना यावर शासन किंवा विरोधक मुगगिळून गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सध्या राज्यात जनता महागाने त्रासली आहे, घरगुती गँस,जीवनावश्यक वस्तू, पेट्रोल, डिझेल, सीएनजी, वाढती बेरोजगारी, नैसर्गिक आपत्ती व अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान, शेतकऱ्यांच्या मालाला न मिळणारा बाजारभाव, आदी मुळे जनता सत्ताधा-याना वैतागली आहे.

असे असतानाच आता मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर धावणाऱ्या वाहनाकडून मोठ्या प्रमाणात टोलवाढ करून त्याची वसुली केली जात आहे. वास्तविक पाहता मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग हा भारत देशातील सर्वात पहिला नियंत्रित प्रवेश महामार्ग असून २००२ साली हा महामार्ग बांधून पुर्ण झाला. 

९४.५ किमी लांबीचा महामार्ग आहे, तो दोन मोठया शहरांना जोडतो, या मार्गावरून दररोज लाखो छोटी मोठी वाहने प्रवास करतात. हा महामार्ग एकूण ६ लेनचा हा मार्ग असतांना जागोजागी दुरुस्ती ची कामे सुरू आहेत, तळेगाव, टोलनाका, भोगदा, खोपोली बायपास, यासह पुणे पासून ते कळंबोली पर्यंत अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवला आहे. यामुळे बहुतांश वेळा ३ लेनच्या जागी दोनच लेन सुरू ठेवल्या जातात, यातून महामार्गावर बऱ्याच वेळा अपघात घडले आहेत व घडत आहेत. 

असे असताना खरे म्हणजे टोल घ्यायला नको पण येथे उलटच घडत आहे, सध्या जवळपास १८ टक्के जुन्या व नव्या महामार्गावर टोल वाढविण्यात आला आहे. यामध्ये कारसाठी २४० रुपये च्या ऐवजी ३२० रुपये, ४९५, ६८५, ९४०' १६३०, २१६५ अशी भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. ट्रक, बस, कन्टेनर, अजून मोठी वाहने यांचा समावेश आहे. अगोदरच महागाने नागरिक हैराण झाले आहेत आणि महामार्गावर दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असताना ही टोलवाढ केली आहे. त्यामुळे संतापात भर पडली आहे.विशेष म्हणजे ऐवढे होऊनही शासनाचे मंत्री, आमदार, खासदार, किंवा विरोधक मुग गिळून गप्प बसले आहेत.

नवतरुण मित्र मंडळ पाणजेच्या वतीने वृक्षारोपण व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न !!

नवतरुण मित्र मंडळ पाणजेच्या वतीने वृक्षारोपण व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न !! ४२ वर्षे परंपरा जोपसणारे मित्र मंडळ. उरण दि २८...