Wednesday, 2 October 2024

अखिल भारतीय कुर्मी (मराठा - कुणबी) क्षञिय महासभेचे राज्यस्तरीय अधिवेशन संभाजीनगर मध्ये 6 ऑक्टोबरला संपन्न होणार !

अखिल भारतीय कुर्मी (मराठा - कुणबी) क्षञिय महासभेचे राज्यस्तरीय अधिवेशन संभाजीनगर मध्ये 6 ऑक्टोबरला संपन्न होणार !
 
*🔸 केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी व महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर निरंजन प्रसाद यांसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार.*

संभाजीनगर, प्रतिनिधी : अखिल भारतीय कुर्मी (मराठा - कुणबी) क्षत्रिय महासभेचे महाराष्ट्र राज्य अधिवेशन येत्या 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 4.00 वाजता छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न होत आहे.

या अधिवेशनासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, कुर्मी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. व्ही.एस.निरंजन, राष्ट्रीय महासचिव उमेश कुमार पटेल, राष्ट्रीय महिला अध्यक्षा लता ऋषी चंद्रकार,  राष्ट्रीय संरक्षक एल.पी. पटेल, राष्ट्रीय युवा अध्यक्ष धीरज पाटीदार तसेच मराठा सरदार लखुजी जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव, खासदार संदीपान भुमरे, खासदार डॉ. कल्याणजी काळे, आमदार  सतीश चव्हाण यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

या अधिवेशनात देशभरातून 300 च्या वर पदाधिकारी उपस्थित राहणार असून या अधिवेशनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मराठा - कुणबी बांधवांना कुर्मी भूषण पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार असल्याचे महासभेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले. 

तर छत्रपती संभाजीनगर येथील रवींद्रनाथ टागोर सभागृह, देवगिरी महाविद्यालय येथे कुर्मी महासभेचे राज्य अधिवेशन पार पडणार असून या अधिवेशनासाठी मराठा - कुणबी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक व पूर्वी महासभेचे प्रदेश महासचिव जयेश शेलार  यांनी केले आहे. 

देशपातळीवर कुर्मी मधील समाज बांधवांचे शिक्षण, शेती, उद्योग, व्यापार, अर्थकारण मजबुत करण्यासाठी आपल्या सर्वांना एकञीत घेवून अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभा काम करीत आहे. छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्य अधिवेशनामध्ये या सर्व विषयांच्या अनुषंगाने समाजाच्या सर्वांगीण उन्नतीच्या दृष्टीने करण्यात येणार आहे.

Tuesday, 1 October 2024

उमेश महाराज शेडगे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार प्रदान !!

उमेश महाराज शेडगे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार प्रदान !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :

             परमपूज्य श्री समर्थ सद्गुरु सिताराम स्वामी शेडगेबाबा यांनी घाटकोपर येथील काजरोळकर सोसायटीमध्ये परमपूज्य श्री समर्थ सद्गुरु सिताराम स्वामी भक्तीधाम सेवाश्रम ची स्थापना केली त्यांच्या माध्यमातून खूप असे समाजकार्य सुरू होते तसेच शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, व्यसनमुक्ती, प्रवचनकार, कीर्तनकार हे घडवले आहेत. तसेच अनेक शिष्यगण घडले की त्यांनी आपलं महाड पोलादपूर रायगड नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सांप्रदायाचे नाव उज्वल केलं सद्गुरू सीताराम स्वामी शेडगे बाबा त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत तीच परंपरा त्यांचे पुत्र उमेश महाराज शेडगे जपत आहे. हेच कार्य पाहून त्यांना २०२४ चा आदर्श रायगड वृत्तपत्र वृत्तवाहिनीचा आदर्श रायगड राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले अंबरनाथ पूर्व येथील वीर बाजीप्रभू देशपांडे पंथ स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला आदर्श रायगड वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित सामाजिक शैक्षणिक क्रीडा पत्रकारिता साहित्य क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्यांना गौरवण्यात आले. तसेच समाज माध्यमातून ह भ प श्री उमेश महाराज शेडगे यांना प्रत्यक्षात, व्हाट्सअप, फेसबुक आणि भ्रमणध्वनी असे विविध माध्यमातून शुभेच्छांचे वर्षाव होत आहे.

बोरघर गावचे चे सुपुत्र 'तरुण तडफदार पदवीधर युवा नेतृत्व अविष्कार गायकवाड' यांची तळाशेत जिल्हा परिषद युवासेना विभाग अधिकारी पदावर नियुक्ती !!

बोरघर गावचे चे सुपुत्र 'तरुण तडफदार पदवीधर युवा नेतृत्व अविष्कार गायकवाड' यांची तळाशेत जिल्हा परिषद युवासेना विभाग अधिकारी पदावर नियुक्ती !!

** अविष्कार गायकवाड यांच्या वर माणगाव इंदापूर खरवली पेण आमडोशी बोरघर विभागातून शुभेच्छांचा वर्षाव आणि जल्लोष

          बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) : हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे संस्थापित शिवसेना, शिवसेना पक्ष प्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते युवासेना प्रमुख सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार श्री. सुधीर ढाणे महाराष्ट्र राज्य विस्तारक यांच्या सूचने नुसार युवा सेना रायगड जिल्हाधिकारी श्री. चेतन गजानन पोटफोडे, जिल्हा चिटणीस डॉ. परेश उभारे, तालुका प्रमुख श्री. गजानन ( अण्णा ) अधिकारी, माणगाव नगर पंचायतीचे नगरसेवक शिवसेनेचे निष्ठावंत नेतृत्व श्री.अजित तार्लेकर, युवासेना माणगाव तालुका अधिकारी श्री रणजित मालोरे, शहर प्रमुख अजिंकेश जाधव, अभिजीत घोणे, इब्राहिम करेल, ऋषिकेश मोरे, अथर्व हाटे, हार्दिक काटे आणि विभाग अधिकारी, शाखा प्रमुख, युवा सैनिक यांच्या उपस्थितीत बोरघर गावचे 'उच्च शिक्षित पदवीधर तरुण तडफदार युवा नेतृत्व अविष्कार आकाराम गायकवाड' यांची युवा सेना विभाग अधिकारी तळाशेत जिल्हा परिषद या पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि युवा सेनेच्या माणगाव, इंदापूर, खरवली, पेण, आमडोशी, बोरघर या विभागात आनंदाचे उत्साहाचे आणि युवा सेनेत जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

     बोरघर येथील नवतरुण, तरूण तडफदार उच्च शिक्षित पदवीधर युवा नेतृत्व अविष्कार आकाराम गायकवाड यांची तळाशेत जिल्हा परिषद युवा सेना विभाग अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याने उपरोक्त इंदापूर माणगाव, खरवली, पेण, आमडोशी, बोरघर शिवसेना युवासेना कार्यक्षेत्रात आणि सदर विभागात आनंदाचे आणि उत्साहपूर्ण युवा जल्लोषाचे वातावरण निर्माण झालेले दिसून येत आहे. 
       बोरघर गावचे तरुण तडफदार पदवीधर युवा नेतृत्व अविष्कार आकाराम गायकवाड यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या युवा सेना विभाग अधिकारी तळाशेत जिल्हा परिषद या पदावर नियुक्ती झाल्याचे समजताच अविष्कार गायकवाड यांच्यावर यांच्या महाविद्यालयीन विराट मित्र परिवार व मित्र मंडळातून आणि आप्त परिवारातून त्यांना प्रत्यक्ष भेटून आणि सोशल मीडियाच्या वॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी माध्यमांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.

महात्मा गांधी जयंती दिनी ठाण्यात शांती यात्रा !!

महात्मा गांधी जयंती दिनी ठाण्यात शांती यात्रा !!

ठाणे , दि. ३० सप्टेंबर - 

ठाण्यातील विविध समविचारी संस्था - संघटना आणि शांतताप्रिय व संविधानवादी ठाणेकर नागरिकांनी महात्मा गांधी जयंती दिनी २ ऑक्टोबर रोजी शांती यात्रेचे आयोजन केले आहे. महात्मा गांधी उद्यान, तलाव पाळी येथील म. गांधी पुतळा येथे सायं. ४ः३० वा. जमून म. गांधीजींना अभिवादन करून यात्रेला सुरुवात होईल. मासुंदा तलावाला वळसा घालून मराठी ग्रंथ संग्रहालय समोरून ठाणे रेल्वे स्टेशन येथील भारतीय संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून यात्रेचे समारोप केला जाणार आहे.

या वेळी समाजात समता, बंधुता, लोकशाही मूल्य, सामाजिक न्याय, स्त्री सन्मान आणि धर्म – जाती पलिकडे माणुसकी जपण्यासाठी भारतीय संविधान याचा प्रचार प्रसार केला जाणार आहे. बेरोजगारी, व्यसनाधीनता आणि महागड्या शिक्षणाचा विळखा यापासून तरूण पिढीला वाचवा, शासकीय कारभारात पारदर्शकता आणणे, सर्वांना शिक्षण, रोजगार, सार्वजनिक आरोग्याची हमी द्या असा आग्रह केला जाणार आहे. यावेळी भारतीय महिला फेडरेशन च्या वतीनें पथनाट्य, अंधश्रद्धा निर्मूलन समिती व समता विचार प्रसारक संस्था यांचेतर्फे गाणी सादर होणार आहे. जागरूक, संविधानवादी व शांतताप्रिय नागरिकांनी यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

जगदीश खैरालिया,
सामाजिक कार्यकर्ता
9769287233

मार्च 2024 शाळांत परीक्षेचा 100% निकाल, शिक्षण निरीक्षक मा. श्री. मुस्ताक शेख साहेबांनी मुख्याध्यापकांचा केला सत्कार !!!!

मार्च 2024 शाळांत परीक्षेचा 100% निकाल, शिक्षक निरीक्षक मुस्ताक शेख साहेबांनी मुख्याध्यापकांचा केला सत्कार !!!!
दै बातमीदार आज ता. 1, संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल कुर्ला पश्चिम या शाळेचा शंभर टक्के निकालाबद्दल माननीय श्री मुस्ताक शेख साहेब, शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई, उत्तर विभाग, चेंबर मुंबई यांच्या शुभहस्ते रात्र शाळेचे मुख्याध्यापक श्री राऊत सर यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. केलेला सन्मान मुख्याध्यापकांचा नसून रात्र शाळेशी संबंधित संपूर्ण घटकांचा आहे असे मत राऊत सरांनी व्यक्त केले.
हा कार्यक्रम एल विभाग माध्यमिक शाळा समूह व आदर्श शैक्षणिक संस्था यांच्या सौजन्याने मायकल हायस्कूल कुर्ला पश्चिम येथे 30 सप्टेंबर 2024 रोजी पार पाडला. या कार्यक्रमांमध्ये नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक व 90% पेक्षा जास्त माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेजचा निकाल लागणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. 
या कार्यक्रमास शिक्षण विभाग बृहन्मुंबई उत्तर विभागाचे सर्व  पदाधिकारी तसेच एल वार्डमधील सर्व शाळांचे मुख्याध्यापक तसेच कार्यक्रमाचे आयोजक उपस्थित होते.

कला व सांस्कृतिक संचालनालय गोवा सरकार, स्मित हरी प्रॉडक्ट्शन मुंबई, मा.आमदार श्री.किरण पावसकर यांच्या सहकार्याने साई पूर्वा आर्ट्स गोवा प्रस्तुत मराठी रंगभूमीवरील अजरामर नाट्यकृती "नटसम्राट" श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे जल्लोषात संपन्न !

कला व सांस्कृतिक संचालनालय गोवा सरकार, स्मित हरी प्रॉडक्ट्शन मुंबई, मा.आमदार श्री.किरण पावसकर यांच्या सहकार्याने साई पूर्वा आर्ट्स गोवा प्रस्तुत मराठी रंगभूमीवरील अजरामर नाट्यकृती "नटसम्राट" श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे जल्लोषात संपन्न !

मुंबई (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर) :

              नटसम्राट' नाटकाचे नाव घेतले की सर्वप्रथम बि.वा.शिरवाडकर अर्थाच श्रद्धास्थानी असलेले कुसुमाग्रज आठवायला लागतात.मग हे नाटक सादर करण्यासाठी ज्या कलाकारांनी आपले योगदान दिले त्यांची नावे एक 'एक करून आठवायला लागतात.

              यशवंत दत्त, श्रीराम लागू, दत्ता भट,उपेंद्र दाते, राजा गोसावी असे कितीतरी कलाकार सांगता येतील त्यांनी ही नटसम्राटची भूमिका साकार करून प्रेक्षकांच्या हृदयात कायम मानाचे स्थान मिळवलेले आहे. त्यामुळेच या आजारामर कलाकृतीवर अभिनेते निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना चित्रपटाची निर्मिती करावीशी वाटत आहे. नाना पाटेकर
यांनी हा नटसम्राट चित्रपटांमध्ये साकार केला होता. नवोदित कलाकारांना सुद्धा या नाटकापासून काही अलिप्त राहाता आले नाही. भालचंद्र उसगांवकर यांनी आपल्या दिग्दर्शनात हे नाटक मुंबईकरांना विनामूल्य दाखवण्याचे ठरवले आणि सोमवारी (दि.३० सप्टेंबर २०२४) रोजी कला व सांस्कृतिक संचालनालय गोवा सरकार आणि स्मित हरी प्रॉडक्ट्शन मुंबई, मा.आमदार शिवसेना सचिव, प्रवक्ता श्री.किरण पावसकर यांच्या सहकार्याने साई पूर्वा आर्ट्स गोवा प्रस्तुत दादर पश्चिम येथील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे मराठी रंगभूमीवरील अजरामर नाट्यकृती "नटसम्राट"चे सादरीकरण करण्यात आले. यावेळी जेष्ठ सिने -नाट्य अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक मान. अरुणजी नलावडे, मा.आमदार शिवसेना सचिव, प्रवक्ता श्री. किरण पावसकर, पत्रकार डॉ.समीर वि. खाडिलकर (माहिती अधिकार, पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण सेना -मुंबई विभाग जन संपर्क अधिकारी )आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवर प्रमुख पाहुणे यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमची सुरुवात झाली. यावेळी मुंबई -गोवा मध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या काही मान्यवर व्यक्ती, कलाकार यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नाटकात भाग घेणारे सर्व कलाकार हे गोव्यातील आहेत तेथील सांस्कृतिक केंद्राने प्रेक्षकांनी या "नटसग्नाट" नाटकाचे कौतुक केल्यानंतर हा कलाकार संच मुंबईत प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होऊन त्यांनी हा विनामूल्य प्रयोग मुंबई मधील रसिकांसाठी सादर केला. गोव्याच्या कला व संस्कृती संचालनालय,पु. ल. देशपांडे कला अकादमी,महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने हा विनामूल्य नाटकाचा प्रयोग झाला.
नटसम्राट नाटकात अप्पासाहेब गणपतराव बेलवलकर यांची मुख्य भूमिका श्री. भालचंद्र उसगावकर यांनी केली.  

         भालचंद्र उसगावकर यांनी ही भूमिका एवढी प्रभावीपणे साकारली की जणू अप्पाराव यांचे जिवंत जीवन चरित्रच त्यांनी डोळ्यासमोर उभे केले. गोव्यातील असूनही शुद्ध मराठीत बेलवलकरांची भूमिका करणे कठीण असून त्यांनी त्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. त्या भूमिकेत कुठेही over acting किंवा कृत्रिमपणा जाणवले नाही. खास म्हणजे नाना पाटेकर यांनी केलेला नटसम्राट चित्रपट गाजल्यावर प्रेक्षकांच्या मनावर त्याचे स्मरण होणे व तुलना होणे साहजिक आहे. यांचे संवाद अप्रतिम होते. आवाजाचा चड उतार, भावना, या नाटकातील लांबलचक संवाद हे उसगावकर यांनी सुंदर सांभाळले आहे. त्यांनी एकट्याने पूर्ण नाटक आपल्या खांद्यावर सांभाळले आहे. त्यांचा एकल दृश्य दर वेळेला सुपरहिट गेला. त्यांचे नाती सोबत होणारे एक दृष्यही खूप सुंदर झाले आहे. बालकलाकार मुलीने सुंदर अभिनय करून श्रोत्यांचे मन जिंकले. 

           नाटकात आपल्या अभिनयाने सर्वात उत्कृष्ट असा अभिनय अजून कोणी केला असेल तर शेवटच्या दृश्यात बूट पॉलिश करणारा मुलगा. या बाल कलाकाराने दिलेल्या सहकार्याने शेवटचा दृश्य खूपच मनाला भिडतो व अप्पांच्या परिस्थितीला पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू येणे हे नाटक अप्रतिम झाल्याचे द्योतक आहे. नटसम्राट सारखा गाजलेला नाटक करणे हे दुहेरी. पण कालच्या या नाटकात मुख्य कलाकारांच्या अभिनयाने सर्व रसिकांचे मन जिंकले.
           याशिवाय या नाटकात नम्रता गडेकर, मनाली प्रियोळकर, सेजल पार्सेकर, हरीष अडकोणकर, सयोग मडकईकर, महेंद्र बांदोडकर, कु.मायरा कुबल, कु.नेहाल अडकोणकर, दादू पार्सेकर, वासुदेव मुळगांवकर, रुपेश शिरगांवकर, पुंडलीक धुळापकर व प्रेमानंद कलशांवकर यांचा या नाटकात कलाकार म्हणून सहभाग आहे.खेमराज पिळगांवकर, सत्यवान शिलकर व संतोष नाईक यांनी तांत्रिक बाजू 'सांभाळलेली आहे. नविता उसगांवकर हे या नाटकाच्या निर्मात्या आहेत.

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट कांदिवली मुंबई तर्फे आश्रम शाळा माण विक्रमगड येथे पितृपक्षातील अन्नदान !!

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट कांदिवली मुंबई तर्फे आश्रम शाळा माण विक्रमगड येथे पितृपक्षातील अन्नदान !!

मुंबई (शांताराम गुडेकर /मोहन कदम) :
            साई परिवार सेवाभावी ट्रस्ट कांदिवली मुंबई तर्फे आश्रम शाळा माण विक्रमगड येथे पितृपक्षातील अन्नदान कार्यक्रम करण्यात आला.

            यावेळी मुलांना सकाळचा नाश्ता जेवण व खाऊ वाटप करण्यात आले. 

            याकामी श्री.मंगेश अंकुश रासम, सौ.मनीषा मंगेश रासम, श्री.अंकुश रासम, सौ. ममता तन्मय सांवत, श्री.अनिल वडके, श्री.प्रकाश राशिंगकर, श्री.महेश वर्मा, कु.समीर सागवेकर, श्री.शरद नाक्ती, श्री.हरीश गवळी, श्री.तन्मय सांवत, सौ.नंदा सांवत, रजनी हुमरस्कर, कु.प्रशांत पिले,  कु.हिरन टेलर, श्री.विनायक सावंत, सौ. दिपीका सावंत, श्री.राम किरत गुप्ता, श्री.महेश मेहता, श्री.संतोष बडंबे व मित्र आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री.रमेश माळी, श्री.यंशवत वातास सर, ज्येष्ठ समाजसेवक श्री. तुलसीदास तांडेल, अधीक्षक श्री.बाबुराव बाबू धांगडा, श्री.मंजुळा मालजी गावित व कर्मचारी वर्गाचे अनमोल सहकार्य लाभले.

नवतरुण मित्र मंडळ पाणजेच्या वतीने वृक्षारोपण व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न !!

नवतरुण मित्र मंडळ पाणजेच्या वतीने वृक्षारोपण व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न !! ४२ वर्षे परंपरा जोपसणारे मित्र मंडळ. उरण दि २८...