Tuesday, 5 May 2020

बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांच्या सुनबाई सौ.आम्रपाली हिची धाडसी कामगिरी.

बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांच्या सुनवाई सौ.आम्रपाली हिची धाडसी कामगिरी

अरूण ठोंबरे ,बदलापूर :- 
बदलापूरची स्नुष्या म्हणून गौरवोद्गार काढण्यात यावे अशी कामगिरी करणारी आम्रपाली खरच ग्रेट आहे. कारण नुकताच तिचा विवाह काही महिन्यापूर्वी बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांच्या मुलाबरोबर मोठ्या दिमाखात पार पडला. त्यानंतर कोरोनाचे संकट उभे राहिले. संपूर्ण देश व जग संकटात असताना  कॅप्टन आम्रपाली पराग पातकर यांनी स्वतः प्रमुख वैमानिक म्हणून काम केले  .प्रत्यक्षात विमान सेवा बंद असताना परंतु औषधांची संपूर्ण देशात आवश्यकता आहे  तातडीची सेवा लक्षात घेऊन दिल्ली - मुंबई - सुरत - दिल्ली असे उडाण केले यशस्वीपणे काम केलेल्या या कन्येचा सर्व थरातून कौतुकाची थाप व अभिनंदन केले जात आहे..त्या विमानाची तिच्यावर संपूर्ण जबाबदारी होती. ती यशस्वीरीत्या पार पाडून सुरक्षित दिल्ली येथे परत आली.

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!! मुंब...