राखीव निधीसाठी मुरबाड पंचायत समितीवर अपंगाचे धरणे आंदोलन * *सभापतीनी आश्वासन देवुन सुद्धा आंदोलन सुरुच.**
मुरबाड :--(मंगल डोंगरे) : तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये अपंगासाठी राखीव असणारा निधी खर्च करण्यात टाळाटाळ होत असल्यामुळे लाँकडाऊन मुळे रोजगार नाही. त्यामुळे होणारी उपासमार टाळण्यासाठी व अन्य विविध मागण्यांसाठी मुरबाड पंचायत समितीवर प्रहार संघटनेच्या माध्यमातून जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ घुडे, तालुका अध्यक्ष एस.एल.पाटील सहसचिव राहुल झुंजारराव व उत्तम घुडे यांच्या सह अनेक अपंग महिलांंनी थाळीनाद आंदोलन सुरु केले असता अधिकाऱ्यांनी त्यांच्या समस्या ऐकुन न घेता कार्यालयातुन पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने बेजबाबदार अधिकाऱ्यांचे कार्यपद्धती वर सर्वत्र नाराजी पसरली आहे.
ग्रामीण भागातील अंध अपंग यांना रोजगाराचे साधन नसल्याने शासनाचे आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थाचे उत्पन्नातील पाच टक्के निधी हा दिव्यांग व तसेच अंध बांधवासाठी राखीव असताना तालुक्यातील 126 ग्रामपंचायत पैकी सुमारे 17 ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी सदर निधी हा अपंगावर खर्च न करता तो प्रलंबित ठेवला तर काही ग्रामसेवकांनी त्याचा अपहार केल्याने ग्रामीण भागातील या ग्रामसेवकांनी एक प्रकारे अंध अपंगाचे तोंडचा घास हिरावल्याने आपल्या ताटात नाही तर पोटात कसे जाईल? त्यामुळे आपले रिकामे ताट घेऊन पंचायत समिती समोर थाळीनाद करण्याचा ईशारा दिला .
परंतु मुरबाड पंचायत समितीस अपंगाचे या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यास अपयश आल्याने शेकडो अपंगानी कार्यालयासमोर थाळीनाद सुरु करुन प्रशासनाचे लक्ष वेधुन घेतले असता.अपंगाचा उद्रेक पाहून पंचायत समितील सर्वच अधिकाऱ्यांनी कार्यालयातुन पळ काढला असता पोलीसांची फौज देखील घटनास्थळी दाखल झाली. दरम्यान आंदोलन कर्त्यांना दिलासा देण्यासाठी सभापती श्रीकांत धुमाळ यांनी आंदोलनात सहभागी होऊन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या व ज्या ग्रामपंचायतीकडे हा निधी प्रलंबित आहे. त्यांना तातडीने खर्च करण्याचे आदेश दिले जातील व ज्या ग्रामसेवकांंनी अनियमितता केली आहे त्यांचेवर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देऊन अपंगाना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला तरी जो पर्यंत अधिकारी समोर येत नाहीत. तो पर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा पवित्रा अपंगानी घेतला आहे.
** मी नव्याने पदभार स्विकारला असल्याने सदर प्रकरणा बाबत मला कोणत्याही प्रकारची माहिती नाही. शिवाय आज ठाणे जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांची आढावा सभा असल्यामुळे मी व विस्तार अधिकारी हे सभेस हजर आहोत. तरी सदर प्रकरणाबाबत निर्णय घेण्यासाठी सभापती श्रीकांत धुमाळ हे निर्णय घेतील. तशा प्रकारची कार्यवाही करण्यात येईल--संघरत्ना खिल्लारे. गटविकास अधिकारी पंचायत समिती मुरबाड.
No comments:
Post a Comment