शिपिंग क्षेत्रात नोकरीचे आमिष दाखवून अनेक सिफेरर्स तरुणांची आर्थिक फसवणूक !
"ऑल इंडिया सिफेरर्स युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांची 26 जुलैला राजभवनात घेतली भेट"
मुंबई : शिपिंग क्षेत्रात नोकरीचे आमिष दाखवून अनेक सिफेरर्स तरूणांची आर्थिक फसवणूक केली जाते. अनेक एजेंट आणि बनावट कंपन्या हे तात्पुरत्या भाडे तत्वावर कार्यालय चालू करतात. सोशल मीडियावर जाहिरातीच्या माध्यमातून तरुणांना नोकरीचे आमिष देतात आणि आर्थिक फसवणूक करतात. तसेच त्यांचे सी. डी. सी आणि पासपोर्टसुद्धा ठेवून घेतात. त्यामुळे तरुणांना इतरत्र नोकरी शोधता येत नाही.
शिपिंग क्षेत्रात नोकरीच्या नावाखाली पैसे उकळण्याचे अनेक गैरप्रकार सुरू आहेत. त्यामुळे हे क्षेत्र बदनाम होऊ लागले आहे. हे गैरप्रकार थांबवण्यासाठी ऑल इंडिया सिफेरर्स युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांची 26 जुलैला राजभवनात भेट घेतली.
बनावट शिपिंग कंपन्या सर्रास मोठमोठ्या शिपिंग कंपन्यांच्या लेटरहेडवर नियुक्तीपत्र, बनावट व्हिसा, फ्लाईट तिकीट आणि इतर कागदपत्र देत आहेत. या क्षेत्रात येणारे सिफेरर्स त्यांना पैसे देतात. बरेच वेळेस हे कायद्याच्या कचाट्यात अडकून देखील यांच्यावर चाप बसत नाही. त्यामुळे अशा बनावट कंपन्यांचे फावत असल्याचे युनियनने राज्यपालांच्या लक्षात आणून दिले.
कंपन्या चालवणारे मास्टर माईंड हे परराज्यात बसून अशा तऱ्हेची फसवी यंत्रणा चालवत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनला देखील मर्यादा पडत आहेत.

No comments:
Post a Comment