Monday, 27 March 2023

नेरुळ जेष्ठ नागरिक सार्वजनिक ग्रंथालयाचा दशकपूर्ती सोहळा संपन्न !

नेरुळ जेष्ठ नागरिक सार्वजनिक ग्रंथालयाचा दशकपूर्ती सोहळा संपन्न !

मुंबई (शांताराम गुडेकर ) :

         येथील ज्येष्ठ नागरिक सार्वजनिक ग्रंथालयाचा दशकपूर्ती सोहळा शनिवारी ज्येष्ठ नागरिक भवन मधील श्री गणेश सभागृहात प्राध्यापक एल. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला.  या कार्यक्रमास प्राचार्य अजित मगदूम, प्राध्यापक मारुती मतलापूरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. प्रसंगी प्रवीण पाटील, ललित पाठक, गणेश करमरकर, पांडुरंग क्षेत्रमाडे, गुप्ता झांशीकर, प्रभाकर गुमास्ते, सूर्यकांत कुलकर्णी, श्री रेवाडकर, रणजीत दिक्षित, नंदलाल बॅनर्जी, आदी मान्यवर उपस्थित होते. जेष्ठ नागरिकांनीही स्फुर्तपणे उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली.
          याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना अजित मगदूम यांनी मराठीतील अभिजात साहित्याचा आढावा घेतला. तसेच जीवनात साहित्याचे महत्त्व किती आहे आणि ते नसल्यास जीवन किती निरस झाले असते याची उदाहरणांसहित सखोल माहिती दिली. झपाट्याने बदलत चाललेले समाज जीवन आणि त्यामुळे हरवत चाललेले संस्कार, जीवनमूल्य याची माहिती देऊन घरातल्या आईची जागा मम्मीने घेतली व तिची मम्मी झाली असे प्रतिपादन एल. बी. पाटील यांनी केले.
            सुरुवातीस ग्रंथालयाचे उपाध्यक्ष रमेश गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रार्थना, स्वागत गीत तसेच महाराष्ट्र राज्य गीत सादर केले. प्रकाश लखापते यांनी आपल्या प्रास्तविक भाषणात ग्रंथालय करीत असलेल्या कार्याचा आढावा घेतला तर कार्याध्यक्ष विकास  साठे  यांनी सांगितले की,  कुठलीही भाषा शुद्ध वा  अशुद्ध  नसतेच फार तर आपण तीला प्रमाणभाषा किंवा बोलीभाषा असे म्हणू शकतो.  खरे तर भावना व्यक्त करण्याचं ते एक साधन आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रजनी कलोसे यांनी उत्कृष्टपणे सांभाळले तर शेवटी श्रीमती सीमा आगवणे यांनी उपस्थितांचे यथोचित आभार मानले.सर्वश्री दत्ताराम आंब्रे,  विजय सावंत,  रणजीत दिक्षित, दिलीप जाधव, श्रीमती कल्पना मोहिते,  श्रीमती कमल अंगणे यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

No comments:

Post a Comment

*संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प) मध्ये गुरुपौर्णिमा व माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न* !!!

*संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प) मध्ये गुरुपौर्णिमा व माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न* !!! मुंबई, कुर्ला (प्रतिन...