Monday, 27 March 2023

जनसेवा संघ तर्फे स्वागत आश्रम चारकोप येथे शालेय मुलांना आवश्यक साहित्य वाटप !

जनसेवा संघ तर्फे स्वागत आश्रम चारकोप येथे शालेय मुलांना आवश्यक साहित्य वाटप !

मुंबई (शांताराम गुडेकर/समीर खाडिलकर )
            जनसेवा संघ तर्फे प्रत्येक महिन्याला स्वागत आश्रम चारकोप येथे शालेय मुलांना आवश्यक असे साहित्य वाटप केले जाते. 

या महिन्याचे साहित्य आज (दि.२७ मार्च) सकाळी ११ वाजता सुनील पाटील (संस्थापक- जनसेवा संघ) यांच्यासह राजूभाई मेहता, रवी टक्कर, अनिल राणे, संदीप परब,  प्रवीण पारेख, संतोष देरवणकर , देव सावंत ,निलेश भाई, अनिल चौबे, मेहुल मेहता, गणेश जोशी, पंकज पटेल या पदाधिकारी, सदस्य आणि सभासद यांस कडून लहान मुलांना शालेय उपयोगी सामान मिठाई, जाम, तांदूळ, गव्हाचे पीठ, डाळ, साखर तसेच अन्य सामान भेट म्हणून देण्यात आली. संघ करत असलेल्या या कामाचे यानिमित्ताने कौतुक होत असून अनेकांनी या संघास शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

*संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प) मध्ये गुरुपौर्णिमा व माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न* !!!

*संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प) मध्ये गुरुपौर्णिमा व माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न* !!! मुंबई, कुर्ला (प्रतिन...