Thursday, 25 May 2023

समृद्धी महामार्गावर वाहन चालकांचा अती आत्मविश्वास, अती वेग व टायर फुटण्यामुळे अपघात, पाहणीतून आले समोर !!

समृद्धी महामार्गावर वाहन चालकांचा अती आत्मविश्वास, अती वेग व टायर फुटण्यामुळे अपघात, पाहणीतून आले समोर !!

भिवंडी, दिं,२५, अरुण पाटील (कोपर)
         समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यापासून या महामार्गावर जानेवारी ते एप्रिलदरम्यान ३५८ अपघातांची नोंद झाली असून, त्यात ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४३ जण गंभीर जखमी व २३६ जण किरकोळ स्वरूपात जखमी झाले आहेत. महामार्ग पोलिसांच्या निरीक्षणानुसार सर्वाधिक अपघात चालकांचा अती आत्मविश्वास,  अती वेग ,वाहनांचे टायर फुटणे या मुळे झाले आहेत.
           या महामार्गावर १२७ अपघात छोट्या स्वरूपात झाल्याने २३६ जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. त्याचप्रमाणे १५३ अपघातांमध्ये कुणीही जखमी झाले नाही. महामार्ग पोलिसांनी केलेल्या पाहणीनुसार सर्वाधिक अपघात वाहन चालकांना डुलकी लागल्याने किंवा सलग प्रवास करून थकवा आल्याने झाले आहेत. 
             तर ८१ अपघात वाहनांचे टायर फुटल्याने घडले असून, उष्ण तापमान आणि अतिवेग यामुळे वाहनांचे टाय फुटत असल्याची बाब पाहणीतून समोर आली आहे. ‘रोड हिप्नोसिस’ची शक्यता समृद्धी महामार्ग बहुतांश सर असून, वाहने चालवताना चालकांच्या नजरेत एकच रस्ता व परिसर येत असतो. महामार्गावर वळण नसल्याने चालकांचा अती आत्मविश्वासामुळे  सावधपणा दूर होतो त्यामुळेही अपघात होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यास ‘रोड हिप्नोसिस’ म्हटले जाते. त्यामुळे या कारणांचा शोध घेण्यासाठीही महामार्ग पोलिस प्रयत्न करीत आहेत.
          रात्री ९ ते १२ या वेळेत भीषण अपघातसमृद्धी महामार्गावर सर्वाधिक १०२ अपघात पहाटे ३ ते ६ या वेळेत झाले असून, त्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र रात्री ९ ते १२ या वेळेत २७ अपघात झाले असून, त्यात सर्वाधिक १० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे यावेळेत झालेल्या अपघातांची भीषणता सर्वाधिक दिसली आहे. त्याचप्रमाणे तर सकाळी ६ ते १२ या वेळेत ८९ अपघात झाले असून, त्यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. दुपारी १२ ते सायंकाळी ६ यावेळेत ९६ अपघात झाले असून, त्यात ८ जणांचा मृत्यू झाला. तर मध्यरात्री १२ ते ३ या वेळेत ३९ अपघातांमध्ये सहा जणांनी जीव गमावला आहे

No comments:

Post a Comment

॥ भात शेती, आपली समृद्धी ॥

॥ भात शेती, आपली समृद्धी ॥ माणगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा कंबर कसूया आपल्या काळ्या आईला हिरवेगार करूया :  किरण पडवळकर तालु...