Thursday, 4 April 2024

कांडकरी विकास मंडळ कासार कोळवणतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे होळी उत्सवनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न !!

कांडकरी विकास मंडळ कासार कोळवणतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे होळी उत्सवनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न !!

मुंबई, (शांताराम गुडेकर /मोहन कदम) :

      रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या कासार कोळवण गावातील कांडकरी विकास मंडळ (मावळती वाडी -कासार कोळवण) या मंडळाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे होळी उत्सव मोठ्या थाटा-माटात संपन्न  झाला. आपली कोकणाची कला व उत्सव अबाधित राखण्याचे कार्य ही अशी मंडळे करत आहेत. त्यातूनच सगळ्या लोकांना  एकत्र आणण्याचे ही माध्यम आहे.त्यातून गावच्या विकासाच्या संदर्भात ही चालना मिळते आहे.संपूर्ण कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन आदरणीय राजाराम रावणंग यांनी केले.प्रतिवर्षी तेच करत असतात. त्यांना आणखी स्फूर्ती  मिळावी व असे अनेक कार्यकर्ते आपल्या गावात घडावेत असे मत अनेकांनी यानिमित्ताने व्यक्त केले.
       संगमेश्वर तालुक्यातील ओझरे जिल्हा परिषद गटातील मौजे कासार कोळवण येथील श्री कांडकरी विकास मंडळ आयोजित सत्यनारायण महापुजेस आमदार शेखर निकम यांनी भेट दिली. ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांनी कार्यक्रमास दिलेल्या सदिच्छा भेटीबद्दल समाधान व्यक्त करुन, त्यांचे आभार मानले व त्यांना शाळ, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. या कार्यक्रमाच्यावेळी आमदार शेखर निकम यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला, गावातील विकासाबाबत चर्चा केली, अड-अडचणी जाणून घेतल्या व उर्वरीत विकास कामे व गावाचा विकास पुढील येणा-या काळात निश्चित टप्या-टप्याने पुर्ण करु असा ग्रामस्थांना विश्वास दिला. यावेळी मानसी करंबेळे (सरपंच), प्रकाश तोरस्कर (उप सरपंच), तोरस्कर गुरुजी, संतोष करंबेळे (मंडळ अध्यक्ष), करंबेळे गुरुजी, शितल करंबेळे (ग्रा.पं.सदस्य), सचिन मांगले (माजी सरपंच), सदानंद करंबेळे, नथुराम करंबेळे, सुहास मांगले, बाबु तोरस्कर, गावकरी मंडळी व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
            हा कार्यक्रम करत असताना  मंडळाचे आधारतंभ व गावकर स्वर्गीय गंगाराम करंबेळे व प्रकाश तोरस्कर सर व मंडळाचे व संघर्ष समितीचे अध्यक्ष पांडुरंग करंबेळे यांची स्मृती कायम राहील. त्यांनी वाडीसाठी, गावासाठी मोठे योगदान दिले आहे. मंडळाचे अध्यक्ष संतोष करंबेळे, सचिव राजाराम रावणंग, खजिनदार दिलीप तोरस्कर, जेष्ठ सल्लागार व आजी -माजी पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते  व सर्व कार्यकारणी मंडळ व सभासद व विशेष करून महिला मंडळ या सर्वांचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठे योगदान मिळाले. या कार्यक्रमाला आर्थिक सहकार्य करणारे सर्व भक्त यांचे ही मोठे योगदान मिळते त्या सर्वांचे मनस्वी आभार व्यक्त करण्यात आले.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...