डॉ. किरण राम गावंड (कंपनी कमांडर) यांना 'डॉक्टरेट ऑफ फिलोसोफी' पदवी प्रदान !
ठाणे, (पंकजकुमार पाटील) -
ठाणे येथे राहणाऱ्या डॉ. किरण राम गावंड (कंपनी कमांडर) यांना नुकतच अमेरिकेतील प्रोवेस विद्यापीठातर्फे "डॉक्टरेट ऑफ फिलोसोफी" ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
गेली ३५ वर्ष पगार न घेता केलेली देशाची सेवा, भारतीय संस्कृती व इतिहासाचे जतन आणि संवर्धन तसेच १५० वर्षापासूनच्या पौराणिक वस्तु, नाणी व शस्त्रे याचे एका ठिकाणी प्रदर्शनीस तथा सुरक्षीत ठेवण्यासाठी "काशीबाई माधवराव गावंड" संग्रहालयाची स्व-कतृत्वावर स्थापना, देशाच्या ठेवा आम जनतेला प्रदर्शनास खुला करून त्यांनी देशाची शान वाढवली आहे. डॉ. गावंड यांच्या जीवनाचे तत्वज्ञान येणा-या पुढील पिढयांना आदर्श मार्ग दाखविण्यास मार्गदर्शन ठरेल यात शंका नाही. या कार्याला सलाम करण्यासाठी त्यांना प्रोवेस विद्यापीठातर्फे ही पदवी एका शानदार कार्यक्रमात सन्मानपूर्वक बहाल करण्यात आली. हि पदवी प्राप्त केल्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
No comments:
Post a Comment