शिंदे सेनेच्या मुरबाड तालुका प्रमुख पदी रामभाऊ दुधाळे !!
** ऐन दिवाळीत शिंदे गटाने तालुका प्रमुख पदाची भाकरी फिरवली **.
**अखेर धनुष्यबान रामाच्या हाती
मुरबाड {मंगल डोंगरे} : शिंदे शिवसैना विभक्त होऊन अडीच वर्ष झाली, पक्षाच तालुकास्तरीय सर्वोच्च पद म्हणून तालुका प्रमुख पदाला मान आहे, अशा या तालुखाप्रमुख पदी ऐन दिपावलीच्या उत्सवात या पदाची शान वाढविणारा तालुका प्रमुख लाभला मुरबाड तालुक्यातील शिव सैनिकांना आहे.
मुरबाड नगर पंचायतचे माजी नगराध्यक्ष राम दुधाळे याची नियुक्ती करून रामदुधाळेंचा गौरव नव्हे तर फार वर्षा नंतर त्या पदावर योग्य व्यक्ती लाभल्याने ख-या अर्थाने आज त्या बहूमुल्य अशा तालुका प्रमुख पदाचा गौरव झाला आहे, तसही तालुक्यात सतेच्या गोधडीची उब घेण्याची प्रथा असता भाजपाच्या एकाधीकार शाहिला, सत्तेला लाथाळून दोन महिन्यापुर्वी भाजपाची सत्ताच नामोहरम करण्याची हिम्मत राम दुधाळे यांनी दाखवून दिली होती, त्यांनी शिंदेच्या शिवसैनेत जाहिर प्रवेश केला होता, तसही काहीचं काम बोलतं तर काही काम बोलतं नव्हे नव्हे तर ज्यांच त्यांच "कर्तव्य" आपली श्रेष्टता सिद्ध करते.
राम दुधाळे यांच्या कामाची दखल व भविष्यातील पक्षवाढिची दुरदृष्टी ठेवून शिवसैना पक्ष प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशा नुसार आज राम दुधाळे याची तालुका प्रमुख पदि नियुक्ती झाल्याने त्यांच्या डँशिगवृत्तीचा फायदा पक्ष वाढिसाठी खचितच होणार यांत शंका नाही, सोबत पक्षांतर्गत गटातटातील मळभ देखील संपुष्टात येत योग्य पद योग्य मनुष्याच्या हातात आले तर त्या पक्षाची व पदाची शान वाढते असाच प्रकार मुरबाड तालुक्यात घडून आल्याने मुरबाड तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
No comments:
Post a Comment