Wednesday, 18 February 2026

पत्रकार कै.धनंजय गोंधळी उरणच्या मातीशी एकजीव असलेला प्रामाणिक पत्रकार... - एल बी पाटील.

पत्रकार कै.धनंजय गोंधळी उरणच्या मातीशी एकजीव असलेला प्रामाणिक पत्रकार...
   -  एल बी पाटील.

उरण दि १७, (विठ्ठल ममताबादे) :
 उरण कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) ने चिरनेर या गावी जाऊन उरणातील जेष्ठ पत्रकार कै धनंजय गोंधळी यांच्या निवासस्थानी ग्रामस्थां समवेत श्रद्धांजली अर्पण केली.या वेळी अध्यक्ष स्थानावर कै.धनंजय गोंधळी यांना मानून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.त्यावेळी कोमसापचे विश्वस्त साहित्यरत्न रायगड भूषण प्रा्.एल.बी.पाटील आपल्या भाषणात म्हणाले की गोंधळीसाहेबांना उरण तालुका एक प्रामाणिक पत्रकार म्हणून मानत आला आहे.शेती,येथील गावे आणि भागातल्या सर्व समस्यांना ख-या अर्थाने न्याय दिला.त्यामुळे त्यांना या मातीशी एकजीव झालेला प्रामाणिक पत्रकार मानतो.यानंतर त्यांच्या गुणांविषयी आणि मैत्रीसंबधी
" दोस्ता, सोडून गेला तू गाव " ही भावपूर्ण कविता सादर केली गेली .

      उद्योगपती राजा खारपाटील म्हणाले की,ते माझे एक चांगले मार्गदर्शक होते.तर उरण कोमसाप अध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे यांनी माझ्यासारख्या तरुण लेखकाला प्रेमाने पत्रकारिकतेचे ज्ञान दिले आहे.तसेच त्यांच्या ब-याच लेखनाचे संकलन करण्याचा सुयोग लाभला. पत्रकार दत्ता म्हात्रे पत्रकार बनण्यात गोंधळी साहेबांचा मोठा वाटा आहे.कवी रमण पंडित आणि कवी शिवप्रताप पंडित यांनी गोंधळी साहेबांच्या स्वभावाने झालेला प्रभाव आपल्या भाषणातून मांडला.सूत्रसंचालन म.का.म्हात्रे यांनी केले.तंटामुक्ती अध्यक्ष अलंकार परदेशी,प्रतीक गोंधळी, चंद्रकांत म्हात्रे, सुहास गोंधळी,अमर परदेशी, चंद्रकांत गोंधळी,वसंत म्हात्रे, जगन्नाथ म्हात्रे या प्रमुख ग्रामस्थांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

बल्याणी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर केडीएमसीची धडक कारवाई !!

बल्याणी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर केडीएमसीची धडक कारवाई !! *कल्याण, दि. 23 एप्रिल 2026* कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘अ’...