Tuesday, 17 February 2026

दुधनी शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात !!

दुधनी शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात !!

भिवंडी प्रतिनिधी (मिलिंद जाधव) : 

भिवंडी तालुक्यातील कुसापूर केंद्रातील जिल्हा परिषद दुधनी शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन आज साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता  पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर करत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त  सहभाग घेऊन विविध कला  सादर करून प्रेक्षकाची मने जिंकली. तसेच गाण्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. यावेळी भिवंडी तालुक्याचे माजी सभापती शांतारामदादा पाटील, ठाणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा दिपालीताई पाटील, दुधनी ग्रामपंचायतीचे सरपंच लक्ष्मणदादा पाटील, दाभाड केंद्राचे केंद्रप्रमुख श्यामसुंदर दोंदे सर, यशोदा आई, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा रेश्माताई मलेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष नरेशभाऊ जाधव, कुसापूर केंद्राचे माजी केंद्रप्रमुख नरेश भोईर सर, ठाणे व पालघर शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष प्रशांतजी घागस सर,उपसरपंच  हर्षदाताई पाटील मॅडम, पोलीस पाटील नम्रताताई भवर, दुधनी शाळेचे मुख्याध्यापक गजानन गायकवाड तसेच सहकारी शिक्षक पुनम गायकवाड  व सतीश वाडीयार, कुसापूर व पाच्छापूर केंद्रातील शिक्षक, प्रकाश दळवी, पालक वर्ग, ग्रामस्थ मंडळी, शिक्षक वर्ग व दुधनी शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

दुधनी शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात !!

दुधनी शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात !! भिवंडी प्रतिनिधी ( मिलिंद जाधव) :  भिवंडी तालुक्यातील कुसापूर केंद्रातील जिल्हा पर...