Thursday, 19 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उलवे शहर तर्फे शिवजयंती उत्साहात साजरी !!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उलवे शहर तर्फे शिवजयंती उत्साहात साजरी !!

उरण दि १९, (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत, जाणता राजा,आदर्श कल्याणकारी राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवजयंती म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उलवे शहर तर्फे गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, सेक्टर १९, उलवे, तालुका पनवेल येथे शिवजयंती उत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले होते . सकाळी ८ वाजता भव्य ज्योत आगमन, सकाळी ११ वाजता मोफत आरोग्य शिबिर, दुपारी १२ वाजता ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ,मोफत रक्त गट तपासणी,छत्रपती शिवाजी महाराज यांची स्मृती चिन्ह देऊन शालेय विद्यार्थ्यांना गौरव,हळदी कुंकू समारंभ, चित्रकला व निबंध स्पर्धा, मान्यवराचे स्वागत व मनोगत अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वच कार्यक्रम, उपक्रमांना जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला होता. शिवभक्त, शिवप्रेमी या शिवजयंती उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट)चे उलवे शहराध्यक्ष संतोष काटे यांनी दिली आहे

No comments:

Post a Comment

बल्याणी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर केडीएमसीची धडक कारवाई !!

बल्याणी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर केडीएमसीची धडक कारवाई !! *कल्याण, दि. 23 एप्रिल 2026* कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘अ’...