Wednesday, 18 February 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवरायांना केले अभिवादन

पंतप्रधान मोदींनी शिवरायांना केले अभिवादन !!


आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांच्या जाज्वल्य स्मृतींना अभिवादन केले आहे. ट्विटरवर (X) आणि अन्य समाजमाध्यमांवरून पंतप्रधानांनी महाराजांच्या शौर्याचा आणि सुशासनाचा गौरव करत देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी आपल्या संदेशात महाराजांचा उल्लेख 'दूरदर्शी नेते आणि स्वराज्याचे पुरस्कर्ते' असा केला. ते म्हणाले की...

"छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक महान योद्धे नव्हते, तर ते एक कुशल प्रशासक आणि विलक्षण रणनीतीकार होते. त्यांचे शौर्य आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील. महाराजांनी जनसामान्यांचे कल्याण (जन-जन के कल्याण) नेहमीच सर्वोच्च मानले आणि त्यांच्या सुरक्षेसाठी स्वतःला समर्पित केले. त्यामुळेच त्यांचे जीवन आजही संपूर्ण भारतवर्षासाठी एक पथप्रदर्शक आहे.

https://x.com/narendramodi/status/2024320273441574954?s=20

No comments:

Post a Comment

टेंपो चालकाने राजेंद्र घरत यांच्या वाहनाला दिली धडक !!

टेंपो चालकाने राजेंद्र घरत यांच्या वाहनाला दिली धडक !! फोर व्हीलर वाहनाचे आर्थिक नुकसान ; नुकसान भरपाई देण्याची व आरोपी वर कडक कारवाई करण्या...