Wednesday, 18 February 2026

दोंडाईचा येथे कब - बुलबुल पथकांचे तीन दिवसीय निवासी राज्यस्तरीय चाचणी शिबिराचे यशस्वी आयोजन !!

दोंडाईचा येथे कब - बुलबुल पथकांचे तीन दिवसीय निवासी राज्यस्तरीय चाचणी शिबिराचे यशस्वी आयोजन !!

राज्य भारत स्काऊट गाईड कार्यालयातर्फे जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून आलेल्या  कब - बुलबुल पथकांचे तीन दिवसीय निवासी राज्यस्तरीय चाचणी शिबिराचे हस्ती भवन दोंडाईचा येथे राज्यस्तरीय चतुर्थ चरण चाचणी ( कब ) व हिरक पंख (बुलबुल) शिबिरात जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून तब्बल ७४कब (मुले) व ६३  बुलबुल (मुली) एकूण १३७  विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. अमळनेर तालुक्यातील जि.प. शाळा उदयनगर येथील जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक तथा कब मास्टर रविंद्र मासुळे यांच्या अथक परिश्रमाणे व मार्गदर्शनाने व जेष्ठ शिक्षक संजय पाटील यांच्या सहकार्याने कब राज्यस्तर चतुर्थ चरण पुरस्कार शिबिरासाठी नोंदणी केलेले शाळेतील कब १) हेमराज हिरालाल पाटील २) समर्थ काशिनाथ मोरे ३) जयेश समाधान पाटील ४) शिवराज योगेश पाटील ५) गणेश मंगेश भिल व ६) समाधान रमेश पाटील हे सहा विद्यार्थी दोंडाईचा येथील  राज्यस्तर चाचणी शिबिरात सहभागी झालेले होते. तीन दिवसीय निवासी शिबिरात सहाही विद्यार्थी लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक कार्यात यशस्वी सहभाग नोंदवून राज्यस्तरावर अव्वल स्थान प्राप्त करत पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत. कब विभागात जळगाव जिल्ह्यातील एकमेव जिल्हा परिषदेची शाळा ठरली. या विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी रविंद्र मासुळे, संजय पाटील, उषा पाटील व नितीन शिंदे यांनी अथक परिश्रम व मेहनत घेऊन करत हे यश साकार केले यशस्वी विद्यार्थ्यांचे गावकरी,पालकांनी तोंडभरून कौतुक केले. तसेच मार्गदर्शक शिक्षकांचेही अभिनंदन व कौतुक करण्यात आले.

वृत्त - राहुल बैसाणे 

No comments:

Post a Comment

शिवप्रतिमा मित्र मंडळाने केडीएमसीच्या सहकार्याने लावली आठ फूट उंचीची 50 बकुळ फुलांची झाडे, आयुक्तांनी लावली उपस्थिती !!

शिवप्रतिमा मित्र मंडळाने केडीएमसीच्या सहकार्याने लावली आठ फूट उंचीची 50 बकुळ फुलांची झाडे, आयुक्तांनी लावली उपस्थिती !!         ...